प्रतिनिधी – गणेश गाडगे क्राईमनामा Live : आज शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या आरंभी जि प प्राथमिक शाळा बागवाडी (निमगाव सावा) शाळेस मा पांडु...
प्रतिनिधी – गणेश गाडगे
क्राईमनामा Live
: आज शैक्षणिक वर्ष 2022-23
च्या आरंभी जि प प्राथमिक शाळा बागवाडी
(निमगाव सावा) शाळेस मा पांडुरंग
पवार यांनी सदिच्छा भेट दिली. आज शाळेत मोठ्या जल्लोषात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी शाळा व्यवस्थापन
समिती अध्यक्ष भिवसेन गाडगे माजी अध्यक्ष
श्री गणेश गाडगे पालकवर्ग व
ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी इयत्ता पहिलीत नव्याने प्रवेश घेणाऱ्या
विद्यार्थ्यांचे फुगा,
पेन्सिल, बिस्किट पुडा, गणवेश व नवी पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी सौ.
सारिका मते,
श्री बाबाजी गाडगे सर, श्री पिंगट सर, विशेष शिक्षक तसेच मा गणेश गाडगे यांनी मनोगत
व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री
तान्हाजी जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले व सौ सुनिता औटी मॅडम यांनी उपस्थितांचे
आभार मानले.
जुन्नर
तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सौ अनिता शिंदे मॅडम व विस्ताराधिकारी श्री विष्णू
धोंडगे साहेब यांनी शाळेला सदिच्छा भेट देऊन शाळा परिसर व लोकसहभाग याबाबत समाधान व्यक्त केले.
मा जि. प. उपाध्यक्ष व जि प सदस्य मा पांडुरंग पवार
यांचे हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. शालेय भौतिक सुविधा बाबत पवार यांनी समाधान
व्यक्त केले
COMMENTS