पुणे : सिंहगड भागातील खानापूर येथील एका हॉटेलमधील सराईत गुन्हेगाराच्या वाढदिवसाची पार्टी हवेली पोलिस ठाण्याचे अधिकारी तेगबीरसिंह संधु यांच्य...
पुणे : सिंहगड भागातील खानापूर येथील एका हॉटेलमधील सराईत गुन्हेगाराच्या वाढदिवसाची पार्टी हवेली पोलिस ठाण्याचे अधिकारी तेगबीरसिंह संधु यांच्या पथकाने उधळून लावली आहे.
याप्रकरणी या गुन्हेगारासह तीस जणांविरुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंहगड पश्चिम हवेली भागात डीजे लावून बेकायदेशीर पाटर्या करणाऱ्यांविरोधात हवेली पोलिसांनी धडक कारवाई मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत पोलिसांनी ही कारवाई केली. गुरुवारी (ता. २) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. खानापूरजवळील सिंहगड फोर्ट व्ह्यू हॉटेल ती समोरच्या पटांगणात मोठी पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस फौजफाट्यासह या ठिकाणी गेले व त्यांनी कारवाई करून हा प्रकार बंद पाडला. या प्रकरणी खडकवासला येथील सराईत गुन्हेगार प रामदास चंदू सोनवणे याच्यासह हॉटेल चालक आत्माराम जावळकर, मिनाज शेख, चंकी कांबळे, रॉबिन उपेंद्र कांबळे, अफिद्र पिल्ले व रवी दत्तात्रय पंधरकर व इतर २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
सिंहगड फोर्टच्या समोरच्या पटांगणात सराईत गुन्हेगार रामभाऊ सोनवणे याच्या वाढदिवसाची बेकायदेशीर पार्टी मध्यरात्री सुरू होती. सध्या जमावबंदीचे आदेश लागू आहेत. त्यामुळे बेकायदा जमाव जमविल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यावेळी हॉटेल मालक आत्माराम जावळकर याच्याकडे हॉटेल चालविण्याचा परवानाही नसल्याचे आढळून आले. हवेली पोलिस ठाण्याचे अधिकारी तेगबीरसिंह संधु यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS