सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील नारायणगावातील जिल्हा परिषद मुलींच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता ५ वी...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील नारायणगावातील जिल्हा परिषद मुलींच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता ५ वी ते ७ वी मधील ५१ मुलींना रोटरी क्लब नारायणगावच्या वतीने हॅपी एज्युकेशन किटचे वाटप करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब नारायणगावचे अध्यक्ष मंगेश मेहेर यांनी दिली.
नवीन सुरू होत असलेल्या शैक्षणिक वर्षाचे औचित्य साधून अनोख्या पद्धतीने "रोटरी एज्युकेशन किट वाटप " कार्यक्रमानिमित्त समाजातील मोलमजुरी करणाऱ्या,गरीब, गरजू पालकांच्या मुलींची गरज ओळखून आवश्यक शैक्षणिक वस्तूंचे हॅप्पी एज्युकेशन किट वाटप करून मुलींच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यातआला.या एज्युकेशन किटमध्ये स्कूल बॅग,वह्या,भूमितीय कंपास पेटी, पॅड आदी शैक्षणिक वस्तू ५१ मुलींना भेट स्वरूपात देण्यात आल्या.
याप्रसंगी नारायणगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष मंगेश मेहेर,फर्स्ट लेडी निर्मला मेहेर,अरविंद ब्रह्मे काका,योगेश भिडे,प्रिया घोडेकर,प्रशांत ब्रह्मे,वसंतराव मेहेत्रे,प्रमिला मेहेत्रे, पुष्पा मेहेत्रे,पूर्वा मेहेत्रे,जिज्ञासा मेहेत्रे,नारायणगाव नंबर २ या शाळेच्या मुख्याध्यापिका आशा कोल्हे,शिक्षिका सुनिता डुंबरे,मोनाली गायकवाड,तसेच रोटरी क्लब नारायणगावचे सर्व सदस्य,शाळेतील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन सचिन घोडेकर,संदिप गांधी,तेजस वाजगे,प्रिया कामत यांनी केले.
या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमासाठी वसंतराव नामदेव मेहेत्रे व प्रमिलाताई वसंतराव मेहेत्रे या आपल्या आई वडिलांच्या लग्नाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथील प्राध्यापिका रुपाली रोहिदास थोरात,जावई रोहिदास किसन थोरात यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन घोडेकर यांनी केले तर शाळेच्या मुख्याध्यापिका आशा कोल्हे यांनी आभार मानले.उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
COMMENTS