हैदराबाद (तेलंगणा): पबमध्ये भेटलेल्या विद्यार्थ्यांनी कारमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या व...
हैदराबाद (तेलंगणा): पबमध्ये भेटलेल्या विद्यार्थ्यांनी कारमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या वेळी एका आमदाराचा मुलगा होता आणि तो मोटारीबाहेर पहारा देत होता, अशी माहिती पुढे आली आहे.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
एक अल्पवयीन
मुलगी (वय १७) मित्रासोबत पार्टीसाठी पबमध्ये गेली होती. अल्पवयीन मुलीने एका
मुलाशी मैत्री केली. यानंतर या मुलीने आपला नवीन मित्र आणि त्याने त्याच्या
मित्रांसह क्लब सोडला. यानंतर त्यांनी तिला घरी सोडण्याचे आश्वासन दिले होते.
हैदराबाद शहरातील ज्युबली हिल्स परिसरात पाच मुलांनी कार पार्क केली आणि त्यानी
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. बलात्काराची घटना होत असताना इतर विद्यार्थी
कारच्या बाहेर पहारा देत होते. या प्रकरणात एका आमदाराच्या मुलाचे नाव समोर आले
आहे. त्यानेही बलात्कार केला आहे. हे सर्व विद्यार्थी इयत्ता 11वी आणि 12 वीचे आहेत. ते
राजकीयदृष्ट्या प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पीडित
मुलगी घाबरली आहे. तिच्या वडिलांनी ती घरी पोहोचल्यावर तिच्या मानेवर जखमा
पाहिल्या. यावेळी तिला त्याबद्दल विचारले. यानंतर तिने, पबमध्ये एका पार्टीनंतर
काही मुलांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे सांगितले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS