सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) चिंचोली (काशीद) ता. जुन्नर येथील भूमिपुत्र संतोष काशीद आपल्या परिवारासह नोकरीच्या निमित्ताने वीस वर्षापा...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
चिंचोली (काशीद) ता. जुन्नर येथील भूमिपुत्र संतोष काशीद आपल्या परिवारासह नोकरीच्या निमित्ताने वीस वर्षापासून ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक झाले आहेत. कोरोना च्या प्रादुर्भावामुळे अनेक वर्षे गावी येता आले नाही. काशिद परिवार गावी येणार आहे, असे समजताच मित्रपरिवाराने त्यांचे औंक्षण करून व फेटे बांधून चिंचोली वेशीतच भव्य स्वागत केले. गावात येताच आपल्या घरी न जाता प्रथम प्राथमिक शाळेला भेट दिली. भूतकाळातील अनेक आठवणीं या प्रसंगी दाटून आल्या. सर्व मुलांना खाऊचे वाटप केले. याच मराठी शाळे मुळेच मी घडलो. आणि परदेशातही मराठी माणसांना एकत्र करून मराठी शाळा सुरू केल्या आहेत, छत्रपती शिवरायांची जयंती उत्साहाने साजरी करतो या घटनांची आठवण करून दिली. याप्रसंगी मार्तंड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब काशीद सरपंच खंडू काशीद, सामाजिक कार्यकर्ते संदीप पानसरे, डॉ. सतीश ताजणे, संकेत टेमगिरे, नवनाथ काशीद, बाळु गुंजाळ, मुख्याध्यापक धोंडीभाऊ दाते, मनीषा काशीद, ज्योती काशीद आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उप- शिक्षिका प्रतिभा केदारी तर आभार मारुती साबळे यांनी व्यक्त केले.
COMMENTS