सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : शैक्षणिक वर्ष सन 2022-2023 आज दिनांक 15 जून 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळ...
सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : शैक्षणिक वर्ष सन 2022-2023 आज दिनांक 15 जून 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छील येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत असताना इयत्ता पहिलीच्या मुलांचे स्वागत शालेय व्यवस्थापन समिती व समस्त ग्रामस्थ आणि पालक वर्ग तसेच शाळेतील शिक्षक वृंदाच्या माध्यमातून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून नवगतांचे स्वागत गुलाबपुष्पे आणि सुंदर फेटे बांधून स्वागत करण्यात आले असून मुलांना शाळापूर्व तयारी मेळावा सन 2022 अंतर्गत स्टॉल क्र. 1 ते 7 मध्ये नोंदणी, शारीरिक विकास, बौद्धीक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, गणनपूर्व तयारी व पालकांना उपक्रम साहित्य वाटप व मार्गदर्शन अशा स्टॉलच्या माध्यमातून नवागत बालके आणि पालक यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शरद नवले तर कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती श्री. गणपत भालेराव उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती तसेच मान्यवर सौ. कांचनताई नवले सदस्या शालेय व्यवस्थापन समिती विमल करवंदे व नूतन साबळे ह्या होत्या. आज प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. तर शाळेच्या वतीने सर्व मुलांना चॉकलेट आणि खाऊ वाटप करण्यात आला. यानंतर छोटीसी बालसभा घेऊन उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. अन्वर सय्यद यांनी केले तर प्रास्ताविक श्री. सुभाष मोहरे यांनी केले व नियोजन सौ. स्मिता ढोबळे, सौ. आरती मोहरे व सौ. लिलावती नांगरे यांनी केले.
COMMENTS