सहसंपादकः-प्रा. प्रविण ताजणे. ( सर ) क्राईमनामा Live : शनिवार दिनांक 25 जून 2022 रोजी नवी मुंबई येथील सुप्रसिद्ध उद्योजक व दानशूर...
सहसंपादकः-प्रा. प्रविण ताजणे. ( सर )
क्राईमनामा Live : शनिवार दिनांक 25 जून 2022 रोजी नवी मुंबई येथील सुप्रसिद्ध उद्योजक व दानशूर व्यक्तिमत्व आणि काटेडे गावचे रहिवासी सन्मा. सुनिलशेठ चिलप साहेब यांच्या माध्यमातून आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल येथे नव्वद मुलांना मोफत दप्तरे देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री.अण्णाजी देवकर, श्री.बाबुशेठ देवकर, श्री.जयराम चिलप उपस्थित होते. प्रथमत: उपस्थित मान्यवरांचे शाळेतील सर्व मुलांनी, ग्रामस्थ , शालेय व्यवस्थापन समिती व पालक आणि शिक्षकवृंदानी टाळ्यांच्या गजरात स्वागत करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सुनिलशेठ चिलप साहेब हे होते तर त्यांनी आपल्या मनोगतात या निमित्ताने पश्चिम भागामध्ये विद्यार्थ्यांना दिलेले साहित्य व भविष्यामध्ये कोणतीही अडचण असल्यास तसेच शैक्षणिक साहित्य याबाबत आम्ही कायमस्वरूपी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले व शाळेचे आणि गावचे विशेष कौतुक केले.
उच्छिल केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ. पुष्पलता
पानसरे मॅडम यांनीही शालेय कामकाजा विषयी व शाळेतील शिक्षकांची असणारी धडपड आणि
गुणवत्तेबाबत कौतुक करत असताना शैक्षणिक विविध बाबींची माहिती ग्रामस्थांना व
मान्यवर यांच्या समोर मांडून शाळेचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. याप्रसंगी शालेय
व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शरद
नवले यांनी आपल्या मनोगतात चिलप साहेब यांनी दिलेले साहित्य हे आदिवासी
ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना नक्कीच उपयोगी पडणार असून शैक्षणिक गुणवत्तेत
कोणत्याही प्रकारची भविष्यात आमच्या शाळेत कमतरता राहणार नाही असे सांगून त्यांना
विविध भौतिक सुविधा मिळाव्यात या अनुषंगाने साहेब आपण आम्ही केलेली मागणी मान्य
करून आज 25000 रुपये खर्च करून आमच्या शाळेतील 90 विद्यार्थ्यांना शालेय दप्तरे
दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद मानले. त्याचप्रमाणे श्री.आत्माराम शिंदे यांनी
आपल्या मनोगत व्यक्त करताना शाळेतील प्रगती व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता
आणि शाळेत या शिक्षकांच्या काळात जवळजवळ वीस लक्ष रुपयांची सुरु असणारी भौतिक
सुविधे बाबतची कामे आणि विविध सोयीसुविधा
याबाबत सर्व शिक्षकांचे कौतुक केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावचे पोलीस
पाटील श्री.सुनील बगाड, शालेय
व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. गणपत भालेराव, शिक्षणप्रेमी
सदस्य श्री. रामदासजी नवले, कृषिमित्र श्री जयराम नवले उच्छिल आदिवासी सोसायटीचे मा.
व्हाईस चेअरमन श्री माऊलीशेठ शिंदे, श्री लक्ष्मण
बगाड संचालक उच्छिल सोसायटी, जय हनुमान दूध सहकारी संस्थेचे माजी चेअरमन श्री विलास
नारायण नवले शालेय व्यवस्थापन समितीचे मा. अध्यक्ष जगदीश शेठ नवले, श्री जयकर नवले, श्री अशोक
भालेराव, सुप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्टर प्रो. प्रा.श्री
दयानंद नवले त्याच प्रमाणे पालक सदस्य श्री किशोर नवले, श्री शिवाजी
नवले आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते. या
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. अन्वर सय्यद तर कार्यक्रमाचे नियोजन
व आयोजन सौ. स्मिता ढोबळे, सौ.लिलावती नांगरे व सौ. आरती मोहरे यांनी तर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेतील पदवीधर शिक्षक श्री सुभाष मोहरे यांनी
मानले.
COMMENTS