बरेली (उत्तर प्रदेश): एका नववधूने हनिमूनच्या रात्रीच अंधाराचा फायदा घेत घरामधील रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळ काढला. याप्रकरणी गुन्हा दाखल झा...
बरेली (उत्तर प्रदेश): एका नववधूने हनिमूनच्या रात्रीच अंधाराचा फायदा घेत घरामधील रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळ काढला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस नवरीचा शोध घेत आहेत.
शाहजहांपूरच्या पलिया दरोबस्त गावातील रहिवासी रिंकू सिंग याचा विवाह कुशीनगर जिल्ह्यातील पतारबा पोलिस स्टेशन परिसरात राहणाऱ्या काजलसोबत झाला होता. विवाहानंतर वधूला गावात मोठ्या उत्साहात आणण्यात आले होते. हनिमूनच्या रात्री अकराच्या सुमारास अचानक वीज गेली. अंधाराचा फायदा घेत नववधूने सोन्या-चांदीचे दागिने, 11 हजारांची रोकड, मोबाईल व इतर साहित्य घेऊन घरातून पळ काढला.
नवरी घरात कोठेच नसल्यामुळे रिंकूला धक्का बसला. कुटुंबियांनी शोध घेतला. मात्र, कोठेच आढळली नाही. मुख्य दरवाजाही उघडा होता. नवरीच्या मोबाईलवर फोन केला तर मोबाईल बंद होता. सासरशी संपर्क साधला. त्यावरही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. दोन दिवसांपासून शक्य तितक्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर रिंकूने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS