पाटना (बिहार): एका महिलेने आपल्याच पतीकडून पैसे उकळण्यासाठी प्रियकरासोबत मिळून मोठे कारस्थान रचले होते. या कारस्थानाअंतर्गत तिने स्वत:चा न्य...
पाटना (बिहार): एका महिलेने आपल्याच पतीकडून पैसे उकळण्यासाठी प्रियकरासोबत मिळून मोठे कारस्थान रचले होते. या कारस्थानाअंतर्गत तिने स्वत:चा न्यूड व्हिडीओ शूट केला.
यानंतर तिने पतीला सायबर तज्ज्ञांच्या जाळ्यात अडकल्याचे सांगितले. पण, तपासादरम्यान माहिती उघड झाली.
पत्नीचा नग्नावस्थेतील व्हिडिओ पाहून नवरा बेशुद्ध पडला. यानंतर त्याने पत्नीला दीड लाख रुपये दिले. पत्नीची मागणी वाढू लागल्यामुळे त्याने पोलिसांकडे धाव घेतली होती. महिलेचे दोन युवकांसोबत विवाहबाह्य संबंध होते. पत्नीला मजा-मस्तीसाठी पैशांची गरज होती. यासाठी तिने अत्यंत घाणेरडा कट रचला होता. तिने पतीकडून पैसे उकळण्याचे ठरवले. या कामासाठी तिने आपला प्रियकर राजूची मदत घेतली होती.
प्रियकर राजूला भेटून स्वत:चा अश्लील व्हिडिओ शूट केला. त्यानंतर काही सायबर तज्ज्ञाच्या जाळ्यात अडकल्याचे सांगून पतीकडून दीड लाख रुपये उकळले आणि व्हिडिओ कॉलदरम्यान अश्लिल व्हिडिओ बनवला. महिलेने नवऱ्याची माफी मागितली आणि सायबर तज्ज्ञाला दीड लाख रुपये दिल्यास तो व्हिडिओ डिलीट करू, असे सांगितले. पत्नीची इज्जत वाचवण्यासाठी पतीने दीड लाख रुपये दिले.
दीड लाख रुपये मिळाल्यानंतर पत्नीने आणखी 50 हजार रुपयांची मागणी केली. पतीने आणखी पैसे देण्यास नकार दिला. शेवटी तिने पतीला सांगितले की, व्हिडीओ शूट करणारा सायबर एक्सपर्ट नाही तर माझा प्रियकर आहे. जर पैसे दिले नाही तर तो माझा व्हिडीओ व्हायरल करेल. या सर्व प्रकारानंतर पतीने पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS