क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोतार्डे गावातील मुख्य डिपीपासून दत्तमंदिर या ठिकाणी गेलेले वीजवितरणचे पोल अक्षरश: को...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोतार्डे गावातील मुख्य डिपीपासून दत्तमंदिर या ठिकाणी गेलेले वीजवितरणचे पोल अक्षरश: कोसळण्याच्या स्थितीत आहेत.
मात्र या गोष्टीची सातत्याने महावितरणच्या कर्मचार्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून जाणीवपूर्वक उडवाउडवीची उत्तरे येत असतात.
सध्या पावसाळा पुढ्यात असताना महावितरणने विजप्रवाहाच्या तारा व वीजेचे खांब वेळीच व्यवस्थित केल्यास भविष्यात होणारी हानी टळेल.
एम.ए.सी.बी.जुन्नर व सबडिव्हिजन आपटाळे या कार्यालयातील अधिकार्यांनी या गोष्टीची तात्काळ दखल घेऊन भविष्यामध्ये होणार्या आपत्तीला थोपविण्याची तजवीज करावी.
खर तर जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागातील बहुतांश अशीच अवस्था आहे. विजवितरणचे पोल हे शेतकर्यांच्या शेतात असल्याने शेतकरी शेतात काम करण्यासाठी जाताना देखील या लोंबलेल्या तारांना भित आहेत.
काही ठिकाणी मुख्य डिपीचे बॉक्स हे उघड्या स्वरूपात असलेले दिसतात, मात्र यामुळे येथे लहाण मुले, जेष्ठ नागरीक व गुराखी यांच्या जिवितास धोका होऊ शकतो.
शेतकरी हे पावसाळ्याच्या पेरणीला सुरूवात करण्या अगोदर या वीजेच्या तारा तसेच कललेले पोल महावितरण विभागाने तातडीने दखल घेत व्यवस्थित करावेत अशी येथील नागरीक मागणी करत आहेत.
COMMENTS