प्रयागराज (उत्तर प्रदेश): एका युवकाने लग्नानंतर काही दिवसांनी मित्रांच्या सल्ल्यानुसार रोज व्हायग्रा घेणे सुरू केले. पण, व्हायग्राचा ओव्हर...
प्रयागराज (उत्तर प्रदेश): एका युवकाने लग्नानंतर काही दिवसांनी मित्रांच्या सल्ल्यानुसार रोज व्हायग्रा घेणे सुरू केले. पण, व्हायग्राचा ओव्हरडोस झाल्यामुळे त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागल्याची धक्कादायक घटना घडली.
प्रकृती गंभीर झाल्यामुळे डॉक्टरांना त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका युवकाच्या लग्नाच्या तीन महिने झाले होते. मित्रांनी त्याला सेक्स पॉवर वाढवण्यासाठी व्हायग्रा घेण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांचा सल्ला न घेता, त्याने दररोज 25-30 मिलीग्राम वियाग्रा घेणे सुरू केले. पुढे त्याने मित्रांच्या सांगण्यावरून पुन्हा डोस वाढवला. तरूणाने 200 मिलीग्रॅम वियाग्रा खाल्ल्यामुळे त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये त्रास वाढू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले.
डॉक्टरांनी सांगितले की, युवक आधीच व्हायग्रा घेत होता आणि लग्नानंतर त्याने त्याचा डोस वाढवला, त्यानंतर त्याची शारीरिक संबध ठेवण्याची क्षमता संपली. डॉक्टर सल्ला न घेता व्हायग्रा घेण्यास मनाई करतात. आता रुग्णाची प्रकृती ठीक असून लवकरच त्याला रुग्णालयातून सोडले जाईल.
COMMENTS