क्राईमनामा Live : आरोपीला घेऊन जाताना त्याच्या चेहऱ्यावर काळ्या रंगाचा कपडा घालून झाकले जाते. कधी त्यांच्या चेहऱ्यावर तसा एक कपडा घातला जा...
क्राईमनामा Live : आरोपीला घेऊन
जाताना त्याच्या चेहऱ्यावर काळ्या रंगाचा कपडा घालून झाकले जाते. कधी त्यांच्या
चेहऱ्यावर तसा एक कपडा घातला जातो. किंवा अनेकदा लाच घेताना अटक झालेली व्यक्ती
तोंडावर आपला रूमाल घेते किंवा स्वतःचा चेहरा झाकतो. पण यामागे नेमकं खरं कारण काय? याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. पण, यामागे खरं कारण काय आहे, हे जाणून घेऊयात...
सामाजिक
व्यवस्था सुरळीतपणे चालण्यासाठी कायदा व न्याय व्यवस्थेचे मोठे योगदान आहे.
एखाद्या
संशयिताला त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी अटक केल्यानंतर तो गुन्हा सिद्ध होईपर्यंत
किंवा निकाल लागेपर्यंत कोणत्याही नियमाची पायमल्ली झाली तर तो कायदेशीर रित्या
गुन्हाच मानला जातो. एखादा अपराध घडल्यानंतर त्या अपराधामागे असलेली संशयित
व्यक्ती पोलिसांनी अटक केल्यानंतर त्या व्यक्तीला न्यायालयांमध्ये किंवा
तुरूंगामध्ये नेताना त्या व्यक्तीचा चेहरा कपड्याने किंवा हाताने झाकलेला असतो.
एखादा गुन्हा घडल्यानंतर संशयित अपराधी व्यक्तीला सार्वजनिक रित्या नेताना त्या
व्यक्तीचा चेहरा दाखवला जाणे हे कायदेशीर नियमांमध्ये बसणारे नाही. पहिल्यांदाच
गुन्हा घडलेल्या व्यक्तीला पोलिसांकडून चेहरा झाकण्यासाठी सूचना केल्या जातात.
संशयित अपराधी
व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्यावर त्याच्या विरोधात साक्ष देणारी एखादी व्यक्ती
उपलब्ध असेल तर अशा परिस्थितीमध्ये संशयित अपराधी व्यक्तीचा कोणत्याही
प्रसारमाध्यमांमध्ये दाखवला जाणे चुकीचे ठरते कारण प्रसारमाध्यमांमध्ये संशयिताचा
चेहरा प्रदर्शित झाल्यावर त्याची ओळख सगळ्यांना झालेली असते व अशा प्रकारांमध्ये
साक्षीदाराला त्याची साक्ष बदलण्यासाठी दबाव आणला जाऊ शकतो, त्यामुळे अशा
प्रकरणांमध्ये साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानली जात नाही.
न्यायालयाकडून निकाल दिला जात
असताना आरोपीची ओळखही या निकालावर प्रभाव टाकू शकते म्हणून आरोपीचा चेहरा हा निकाल
लागेपर्यंत झाकला जातो. इंडियन एव्हिडेंस अँक्टमध्ये सुद्धा यासंदर्भात वर्णन
केलेले आहे. मात्र यासाठी कोणत्याही विशिष्ट अशा तरतुदी नाहीत.
संशयित
आरोपींना न्यायालयामध्ये नेताना किंवा तुरूंगात निर्माण नेत असताना सध्याच्या
ट्रेंड नुसार उपस्थितांकडून त्यांचे व्हिडिओ किंवा फोटो काढून ते सोशल मीडियावर
व्हायरल केले जाऊ शकतात व याचा प्रभाव संभाव्य निकालावर पडू शकतो म्हणून आरोपींना
निकाल घोषित करण्या अगोदर चेहरा झाकण्याचा सल्ला दिला जातो. कोणत्याही
गुन्हयामध्ये न्यायालयाकडून निकाल लागल्यानंतर व आरोपीला शिक्षा झाल्यावर किंवा तो
गुन्हा सिद्ध झाल्यानंतर आरोपीची ओळख सार्वजनिकरीत्या करून देण्यास कोणतेही
निर्बंध नाहीत व अशा परिस्थितीमध्ये आरोपीचा चेहरा झाकला जात नाही. पण, सराईत गुन्हेगारांनी गुन्हा
केल्यानंतर त्यांना न्यायालयात नेतांना किंवा तुरुंगात आणले जात असताना त्यांचा
चेहरा झाकला जात नाही.
एखादा
गुन्हा घडला तर पोलिस घटनास्थळाचा पंचनामा करतात. तो करताना जे लोक घटनास्थळी हजर
असतात त्यांना पंच किंवा साक्षीदार म्हणून सहभागी करून घेतले जाते. जेणेकरुन तो
दावा कोर्टात गेला तरि सरकारी बाजू कमकुवत होऊ नये. गुन्हा घडला आरोपी पळून गेले
तर जेव्हा ते पोलिसांना सापडतात तेव्हा आरोपींना ओळखण्यासाठी ओळखपरेड केली जाते.
ओळख परेड करण्यापूर्वीच आरोपीचा चेहरा दाखवला जात नाही.
COMMENTS