पुणे : बहिणीच्या दिराने शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केल्यानंतर त्याला विरोध केला. यानंतर गल्लीमध्ये बदनामी केल्यामुळे एका 30 वर्षाच्या म...
पुणे : बहिणीच्या दिराने शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केल्यानंतर त्याला विरोध केला. यानंतर गल्लीमध्ये बदनामी केल्यामुळे एका 30 वर्षाच्या महिलेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
रुपेश मिटर ऊर्फ
सेन्डो पवार (वय 32), अक्षना रुपेश पवार (वय 27), मिटर ऊर्फ सॅन्डो चॉकलेट पवार (वय 55), अंजु ऊर्फ वंजा मिटर पवार (वय 45, रा. पवार वस्ती, धनकवडी) अशी
गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत विमाननगरमधील यमुनानगर येथे राहणार्या
महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संबंधित प्रकार 13 ते 19 मे आणि 17 व 18 जून 2022 रोजी यमुनानगर येथे घडला आहे.
पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, 'फिर्यादी आणि आरोपी हे नातेवाईक आहेत.
फिर्यादी यांना दोन बहिणी आहेत. रुपेश हा फिर्यादी यांच्या बहिणीचा दीर आहे.
त्याची पत्नी, आई, वडिल हेही आरोपी
आहेत. रुपेश याने फिर्यादी यांची दुसरी बहीण हिच्याबरोबर संबंध ठेवण्याचा प्रयत्न
केला. त्याला विरोध केल्यावर बदनामी करण्याचा प्रयत्न केला. शिवाय, आपल्या भावजयीला फोन करुन शिवीगाळ केली. त्यांच्या
गल्लीमध्ये त्यांच्या दुसर्या बहिणीची बदनामी केली. या प्रकारामुळे त्यांच्या
बहिणीने 18 जून रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस पुढील
तपास करीत आहेत.
COMMENTS