सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : तांबे ( ता जुन्नर) येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक व शिक्षकनेते...
सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : तांबे ( ता जुन्नर) येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक व शिक्षकनेते भास्करराव पानसरे यांचे आज शुक्रवारी दि ३ जून रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास अपघाती निधन झाले.
भास्करराव पानसरे हे त्यांच्या प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावामुळे अजातशत्रू म्हणून ओळखले जात होते शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढणारे शिक्षक नेते म्हणून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे
जुन्नर तालुक्याच्या आदीवासी भागातील तांबे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. शिक्षक लोकशाही आघाडीचे जुन्नर तालुका अध्यक्ष होते. पानसरे सर यांनी संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील शिक्षककांना संघटीत करुन शिक्षकांचे बहुतांशी प्रश्न मार्गी लावले
जुन्नर तालुका मराठी अध्यापक संघातही सर कार्यरत होते नारायणगाव येथील सेकंडरी स्कूल एम्प्लिॉईज सोसायटीची शाखा सुरु करण्यात त्यांचा मोलाचा योगदान होते
मराठी भाषा दिनानिमित्त चाळकवाडी येथून निघणारी मराठी भाषा दिंडी जुन्नरमध्ये आल्यानंतर या मराठीभाषा दिंडीत ते गेल्या अनेक वर्षांपासून सहभाग होत होते व या मराठी भाषा दिंडीचे ते स्वागत करत
आज सायंकाळी सहा वाजता त्यांच्यावर त्यांच्या जन्मगावी तांबे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
COMMENTS