सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे (बांगरवाडी) या त...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे (बांगरवाडी) या तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे नुकतेच नॅशनल बोर्ड ऑफ एक्रीडीशन (एन.बी.ए.) राष्ट्रीय पातळीवरील समितीकडून पाहणी करण्यात आली व त्यांनी निर्माण केलेल्या मानांकनानुसार संस्थेचे कामकाज उत्कृष्ट वाटल्याने एन बी ए कडून सन २०२५ पर्यंत कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांचे मूल्यांकन करण्यात आले अशी माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली.
एनबीएतर्फे देशातील अभियांत्रिकी, फार्मसी, मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट या संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता व दर्जा सुधारण्यासाठी महाविद्यालय स्तरावर शाखानिहाय मूल्यांकन, मानांकन दिले जाते. त्यानुसार संस्था उत्कृष्ट शैक्षणिक दर्जा राखण्यासाठी सतत प्रयत्न करतात.
एन बी ए समितीने समर्थ पॉलिटेक्निक मध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा, प्रत्येक विभागातील कागदपत्रांची तपासणी केली.तीन दिवसामध्ये समितीने प्रामुख्याने अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, रिसर्च ऍण्ड कन्सल्टन्सी, भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांचा फिडबॅक, आउट कम बेस्ड एज्युकेशन, सीओ-पीओ मॅपींग, प्लेसमेंट याचे मूल्यमापन केले. त्याचबरोबर कार्यशाळा, ग्रंथालय, अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, ऑफीस, जिमखाना, कॅन्टीन, क्रीडा विभाग, मुलांनी केलेले प्रोजेक्ट, कॉम्प्युटर, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग व सायन्स विभागाचे लॅब आणि तेथील कागदपत्रांची तपासणी केली. तसेच महाविद्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या इतर सेवा-सुविधांची तपासणी केली व समाधान व्यक्त करत कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना सन २०२५ पर्यंत मानांकन प्रदान केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण देणे या हेतूने प्रेरित होऊन सन २००८ साली अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके व विश्वस्त वल्लभ शेळके यांनी समर्थ पॉलिटेक्निक या नावाने पहिले तंत्रनिकेतन उभे केले.
समर्थ पॉलिटेक्निक मध्ये कॉम्प्युटर इंजिनीरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकाट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इ. अभ्यासक्रम शिकवले जातात.
गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण व विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यामधील सुसंवाद यामुळे संस्थेने प्लेसमेंट, उत्कृष्ट निकाल, शासकीय, अशासकीय, खाजगी शिष्यवृत्ती, सेमिनार, औद्योगिक सहली, तज्ञ मार्गदर्शन, ऑनजॉब ट्रेनिंग, इंटर्नशिप प्रोग्रॅम यांसारख्या अनेक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने सातत्यपूर्ण प्रयत्न केले. आज समर्थ संस्थेतील अनेक विद्यार्थी परदेशात नोकरी करत आहेत. नोकरीबरोबरच काही विद्यार्थ्यांनी स्वतःचा स्टार्ट अप बिझनेस देखील सुरू केलेला आहे.
एन.बी.ए. समितीमध्ये चेअरमन म्हणून चंदिगढचे प्रोफेसर डॉ. सी.एस.राव, अलिगढचे डॉ.रशीद अली, हरियाणाचे डॉ.एम एल अगरवाल, कर्नाटक चे डॉ.एच के इ लोठा आदींचा समावेश होता.
मूल्यांकन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राचार्य अनिल कपिले,प्रा.संजय कंधारे, एन.बी.ए. समन्वयक प्रा. श्याम फुलपगारे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, खजिनदार तुळशीराम शिंदे यांनी सर्वांचे अभिनंदन केले व भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
COMMENTS