पुणेः लोणीकंद पोलिसांनी शेतक-यांचे शेती पंप चोरणार्या दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून चार गुन्हे उघड केले आहेत. शिवाय, नऊ शेतपंप ताब...
पुणेः लोणीकंद पोलिसांनी शेतक-यांचे शेती पंप चोरणार्या दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून चार गुन्हे उघड केले आहेत. शिवाय, नऊ शेतपंप ताब्यात घेतले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
लोणीकंद पोलिस स्टेशन हे पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील ग्रामीण भागाशी जोडले गेले आहे. लोणीकंद पोलिस स्टेशनची हद्द ही अनेक गावांना जोडली गेलेली असल्याने त्यामध्ये पिंपरी सांडस, न्हावी सांडस, खंडोबा माळ अशी अनेक गावे भीमा नदीचे काठावर वसलेली आहे. त्या ठिकाणी शेतक-याचे शेतात पाणी देण्यासाठी नदीच्या किनारी लावलेले शेती पंप हे वारंवार अज्ञात चोरटे चोरुन घेवून जात असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी हवालदिल झाला होता. त्याअनुषंगाने लोणीकंद पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे पोलिस अंमलदार बाळासाहेब सकाटे यांनी गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळवुन शेतक-यांचे शेती पंप चोरणारे चोर १) आकाश सुभाष जगताप (वय २३ वर्ष, रा. मु. पो. न्हावी सांडस, ग्रामपंचायत ऑफीस मागे, ता. हवेली, जि. पुणे), २) हर्षद केतन जगताप (वय २२ वर्ष, रा. मु.पो. न्हावी सांडस, न्हावी फाटा, राहु रोड, ता. हवेली, जि. पुणे) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सदरबाबत योग्य ती चौकशी केल्यावर वरील आरोपींनी सदर परिसरातील शेती पंप चोरी केल्याचे कबुल केले. दोघांना अटक करुन त्यांची पोलिस कस्टडी घेवून आरोपींकडून लोणीकंद पोलिस स्टेशन कडील एकुण ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. चारही गुन्हयातील २,७०,०००/- रुपये किंमतीचे चोरीस गेलेले एकूण ९ शेती पंप गुन्हयाचे पुरावेकामी जप्त करण्यात आले आहेत. आरोपींकडून आणखीन गुन्हे उघडकीस येणेकरिता आरोपीतांकडे योग्य तो तपास लोणीकंद पोलिस स्टेशन करीत आहेत.
सदरची कामगिरी ही नामदेव चव्हाण, अपर पोलिस आयुक्त पुर्व विभाग, पुणे शहर, रोहिदास पवार, पोलिस उपआयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, किशोर जाधव, सहा. पोलिस आयुक्त येरवडा विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली गजानन पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणीकंद पोलिस ठाणे, पुणे शहर, मारुती पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे), सपोनि गजानन जाधव, निखिल पवार, पोउपनि श्रीकांत टेमगिरे, व तपास पथकातील पोलिस अंमलदार बाळासाहेब सकाटे, विनायक साळवे, अजित फरांदे, सागर जगताप, अमोल ढोणे, आशिष लोहार, पांडुरंग माने, अजित कारकुड, प्रशांत धुमाळ यांनी केली आहे. पुढील अधिक तपास पोलिस हवालदार बाळासाहेब सकाटे हे करीत आहेत.
COMMENTS