लखनौ (उत्तर प्रदेश): दीर-वहिनीच्या अनैतिक संबंधाची माहिती कुटुंबात समजली होती. दोघांच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याने छोट्या मुलाने आईला ...
लखनौ (उत्तर प्रदेश): दीर-वहिनीच्या अनैतिक संबंधाची माहिती कुटुंबात समजली होती. दोघांच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याने छोट्या मुलाने आईला बेदम मारहाण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
हसनापूर गावात ही धक्कादायक घटना घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकारी योगेंद्र सिंह मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामश्री (वय ६०) हिचा मृतदेह शुक्रवारी रात्री सुमारे १०च्या सुमारास पोलिसांना सापडला होता. मृत महिलेचे नातेवाईक तिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात होते. पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला होता. अहवाल हाती आल्यानंतर हत्येची धक्कादायक बाब उघडकीस आली.
मलिक यांनी सांगितले, ग्रामस्थांकडे केलेल्या चौकशीदरम्यान रामश्रीचा धाकटा मुलगा संतराम आणि मोठी सून कामिनी यांच्यावर संशय बळावला. त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांच्यातील अनैतिक संबंधांची बाब उघडकीस आली. त्यानंतर त्यांनी वृद्ध आईची हत्या केल्याचे कबूल केले. आरोपी सून कामिनी हिचा पती राजेंद्र सिंह मुंबईत नोकरी करतो. त्यांचा पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पती मुंबईत असल्याने कामिनी आणि संतराम यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. दोघांच्या अनैतिक संबंधाची माहिती ग्रामस्थ आणि रामश्री यांना समजली होती. वहिनी आणि दिरामधील या संबंधांना रामश्री विरोध करायची. त्यातून त्या तिघांमध्ये सातत्याने वाद व्हायचे. त्यामधून ही हत्या झाल्याचे तपासादरम्यान पुढे आले आहे.
COMMENTS