जळगाव : बेलदारवाडी ता. चाळीसगाव येथील तरुणाने जळगाव शहरातील तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आ...
जळगाव : बेलदारवाडी ता. चाळीसगाव येथील तरुणाने जळगाव शहरातील तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान मोहन कुमावत असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
जळगाव शहरातील हॉटेल रॉयल पॅलेससमोर 16 जूनरोजी सायंकाळी भगवान कुमावत याने तरुणीचा हात धरुन तिच्यासोबत अश्लिल संवाद केला. तरुणीने त्याच्या मागणीस नकार दिल्यानंतर त्याने तिला चापटा बुक्क्यांनी मारहाण करत स्वत: मरुन जाण्याची तिला धमकी दिली. तरुणीने तरुणाविरुद्ध केलेल्या सर्व आरोपांच्या आधारे रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक शांताराम पाटील करत आहेत. तरुणास अद्याप अटक नाही.
COMMENTS