विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले.( सर ) क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील विशेषता ग्रामीण व आदिवासी भागातील दहावीच्या परिक्षेत उज्वल यश ...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले.( सर )
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील विशेषता ग्रामीण व आदिवासी भागातील दहावीच्या परिक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या प्रत्येक शाळेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे अध्यक्ष ॲड. संजयराव शिवाजीराव काळे साहेब व श्री शिव छत्रपती महाविद्यालय यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2021-2022 मधील दहावीच्या परिक्षेतील प्रथम, द्वितिय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पेढे व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्याना श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष ॲड संजयराव काळे म्हणाले की ' ग्रामीण व आदिवासी भागातील गुणवान व हुशार विद्यार्थी फक्त आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणांपासून वंचित राहू नये व त्यांनी उच्चशिक्षित होऊन आपली स्वप्न पूर्ण करून समाजाची सेवा करावी म्हणून संस्थेने हा निर्णय घेतला आहे .
अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही बी कुलकर्णी व प्रभारी प्राचार्य डॉ उत्तम शेलार ' उपप्राचार्य डॉ देवेंद्र उजगरे व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. प्रतिभा लोढा ' पर्यवेक्षक प्रा. श्रीमंते ' एम सी व्ही सी विभागप्रमुख प्रा नेटके ' कला, वाणिज्य विभागप्रमुख प्रा तांबे, विज्ञान विभागप्रमुख प्रा कासार यांनी या सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच संस्थेच्या वतीने कॉलेजच्या प्राध्यापकांनी या शाळेत व विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक केले. यामध्ये निरगुडे, आर्वी, आपटाळे, येणेरे, चिंचोली काशिद, पारुंडे, तांबे, सावरगाव, धामणखेल, चिंचोली कोकणे, शिरोली, राजूर, व खानगाव, खामगाव 'पांगरीमाथा' बल्लाळवाडी, डिंगोरे, उदापूर, आर्वी, मढ तसेच जुन्नर शहरातील व परिसरातील सर्वच शाळा अशा एकूण 28 शाळेच्या १०१ गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व पेढे देऊन तसेच पालक व संबधित शाळेतील शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या विशेष उपक्रमाचे विद्यार्थी, पालक व समाजाकडून स्वागत होत आहे.
COMMENTS