पुणेः टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे १८ मार्च रोजी होळीच्या दिवशी बाळू बारहाते या युवकाचा खुन झाला होता. खून करुन मृतदेह घोडनदीपात्रात टाकण्य...
पुणेः टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे १८ मार्च रोजी होळीच्या दिवशी बाळू बारहाते या युवकाचा खुन झाला होता. खून करुन मृतदेह घोडनदीपात्रात टाकण्यात आला होता. पोलिसांनी संशयित म्हणून अनेक जणांची चौकशी केली व यात आरोपी म्हणून दिगंबर बारहाते याला अटक करण्यात आली होती.
महिनाभरानंतर सहाय्यक
पोलिस उपनिरीक्षक नजिम पठाण यांनी सखोल तपास करून खरे आरोपी भानुदास वाळुंज, अजय मिडगुले यांना
पुराव्यासहीत गजाआड केले. हे आरोपी मिळाल्यानंतर निरापराधार बारहाते याची सुटका
होणे गरजेचे होते. या खुनाच्या गुन्ह्यातून त्याला काढून टाकणे महत्वाचे होते.
परंतु, शिरूर न्यायालयाने
त्याला जामीन दिला नाही. खरे आरोपी गजाआड होऊनही दिगंबर बारहाते याला येरवडा
कारागृहात बराच काळ राहावे लागले. अखेर त्याची तब्बल तीन महीन्यानंतर सत्र न्यायालयाने
जामिनावर सुटका केली.
दिगंबर बारहाते याला
या प्रकरणात हाकनाक त्रास झाला असून,
त्याची बदनामी ही झाली आहे. खरे आरोपी गजाआड झाल्यावर त्याला लगेच मुक्त
करणे गरजेचे असताना बराच काळ कोठडीत राहावे लागले आहे. पोलिसांनी कारवाई करताना
निरापराधार नागरिकांवर अन्याय होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे, अशी चर्चा सध्या टाकळी
हाजी भागात होत आहे.
COMMENTS