पुणे : पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी संतोष जाधव याला गुजरातमधून अटक केली आहे. या प्...
पुणे : पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी संतोष जाधव याला गुजरातमधून अटक केली आहे. या प्रकरणात सौरभ महाकाळनंतर आता पुणे पोलिसांना दुसऱया आरोपीला अटक केली आहे.
सिद्धू मूसेवाला खून प्रकरणातील शूटर संतोष जाधव याला पुणे पोलिसांनी अटक
केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. जाधव हा सिद्धू
मूसेवाला हत्याकांडातही वॉन्टेड संशयित होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी मूसेवाला खून
प्रकरणातील संशयित जाधव याच्या साथीदारालाही अटक केली आहे. संतोष जाधवला रविवारी
(ता. १२) रात्री उशिरा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. 20 जूनपर्यंत त्याला पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ दोन वर्षापासून खून केल्यानंतर फरार झाले होते.
हे दोघंही पंजाबमध्ये राहत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. हे
दोघे ही लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीमधले असल्याचे समोर आले आहे. पुणे ग्रामीण
पोलिसांनी पंजाब पोलिसांना सीसीटीव्ही पाहून संतोष जाधवची माहिती सांगितली होती.
दरम्यान, गायक सिद्धू मुसेवाला याच्यावर हल्ला
करण्याकरता सचिन बिश्नोई गॅंगने महाराष्ट्र राज्यातून दोन शार्प शूटर बोलावले
होते. संतोष जाधव आणि महाकाल नावाचे हे दोन शूटर होते. त्यांनी मुसेवालावर गोळीबार
केला, यांची नावे पंजाब पोलिसांनी जाहीर केली होती.
मुसेवालांची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यातून शूटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले
होते. 3 शूटर्स पंजाबमधील होते. 2 महाराष्ट्रातले, 2 हरियाणातले आणि
यामधील एक शूटर्स हा राजस्थानमधील होता.
COMMENTS