पुणे: शिक्रापूर-चाकण रस्त्यावरून रात्रीच्या सुमारास तीन मित्रांना आपल्या बुलेटवर घेऊन जाणे चांगलेच महागात पडले आहे. युवकाची दुचाकी अज्ञात वा...
पुणे: शिक्रापूर-चाकण रस्त्यावरून रात्रीच्या सुमारास तीन मित्रांना आपल्या बुलेटवर घेऊन जाणे चांगलेच महागात पडले आहे. युवकाची दुचाकी अज्ञात वाहनाला धडकून झालेल्या अपघातात सुरज मच्छिंद्र गंगावणे (वय २३) या युवकाचा मृत्यू झाला आहे.
पाठीमागे बसलेले दत्ता संतोष गायकवाड, धनू दत्तात्रय पांढरे व रोहित पोपट पवार हे तिघे जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शिक्रापूर-चाकण रस्त्याने शिक्रापूर बाजूने चाकणच्या दिशेने सुरज गंगावणे हा १२ जून रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्याच्या ताब्यातील एम एच १४ जे ओ ९३६० या बुलेट दुचाकीहून चालला होता. वाजेवाडी गावच्या हद्दीमध्ये असलेल्या हॉटेल ग्रीनपॉइंट या हॉटेल समोर आल्यानंतर कोणत्यातरी अज्ञात वाहनाला सदर बुलेट दुचाकीची धडक बसली. या अपघातात बुलेट दुचाकीवरील चौघे युवक रस्त्यावर पडून जखमी गंभीर जखमी झाले. यावेळी झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेले दत्ता संतोष गायकवाड व धनु दत्तात्रय पांढरे (दोघे रा. सिद्धेगव्हाण ता. खेड जि. पुणे), रोहित पोपट पवार (रा. साबळेवाडी ता. खेड जि. पुणे) हे तिघे जखमी झाले आहेत. दुचाकी चालक युवक सुरज मच्छिंद्र गंगावणे (वय २३ वर्षे रा. सिद्धेगव्हाण ता. खेड जि. पुणे) याचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई अमोल मारुती रासकर (वय २९ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे खबर दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी सुरज मच्छिंद्र गंगावणे (वय २३ वर्षे रा. सिद्धेगव्हाण ता. खेड जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पवार व पोलिस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहेत.
COMMENTS