नाशिक : बहिणीच्या पतीसोबत लग्नाचा तगादा लावणा-या मेहुणीची हत्या झाल्याचे 11 जून रोजी उघड झाल्यानंतर घोटी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्य...
नाशिक : बहिणीच्या पतीसोबत लग्नाचा तगादा लावणा-या मेहुणीची हत्या झाल्याचे 11 जून रोजी उघड झाल्यानंतर घोटी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मी संजय पवार (20), रा.बिरुळे ता. नांदगाव असे हत्या झालेल्या मेहुणीचे नाव आहे. मेहुणीची हत्या करणा-या अधरवड येथील शरद महादू वाघ या संशयीतास अटक करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील कातकरी वस्तीवर हत्येचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ माजली आहे.
जमिनीच्या वादातून बारशिंगवे गावातील घरे संतप्त जमावाने पेटवून दिल्यानंतर झालेल्या हल्ल्यात मेहुणीचा मृत्यू झाल्याचा बनाव शरद वाघ याने पोलिसांजवळ केला होता. मात्र प्रश्नांचा भडीमार व पोलिसी खाक्या दिसताच त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. अधरवड येथील शरद वाघ हा कातकरी वस्तीवर दोघा बायकांसह रहात होता. दोन्ही बायका हा सख्ख्या बहिणी आहेत. त्याची लहान मेहुणी त्याला आपल्यासोबत तिसरे लग्न करण्यासाठी गळ घालत होती. मात्र संशयित शरद तिच्यासोबत तिसरे लग्न करण्यास तयार नव्हता. 10 जून रोजी दोघात या विषयावरुन पुन्हा वाद झाले. त्याच्याकडून नकार मिळाल्यानंतर लक्ष्मीने जवळच्या काही झोपड्यांना आग लावली. त्यावेळी मेहुणी लक्ष्मीला त्याने लाकडी दांड्याने केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यु झाला. जमिनीच्या वादातून बारशिंगवे गावातील जमावाने केलेल्या हल्ल्यात तिचा मृत्यु झाल्याचा बनाव त्याने केला. मात्र त्याचा बनाव पोलिसांपुढे फार वेळ तग धरु शकला नाही. अशाप्रकारे फिर्यादीच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
COMMENTS