क्राईमनामा Live : दूरदर्शनवरील प्रसिध्द वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे काल राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या एकेकाळच्या सहकाऱ्...
क्राईमनामा
Live : दूरदर्शनवरील
प्रसिध्द वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे काल राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या एकेकाळच्या सहकाऱ्याने ही माहिती वृत्तसंस्थेला दिली. भिडे हे 68
वर्षांचे होते.
1980
ते 1990 च्या दशकात महाराष्ट्रात घरोघरी दूरचित्रवाणी संच नव्यानेच येऊ लागले होते.
त्या काळात मराठी बातम्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आकाशवाणी आणि दूरदर्शन
ही दोनच इलेक्ट्रॉनिक माध्यमे होती. त्या काळात दूरदर्शनवर मराठी वृत्तनिवेदक
म्हणून प्रदीप भिडे हे अत्यंत लोकप्रिय वृत्तनिवेदकांपैकी एक मानले जात असत.
प्रदीप भिडे हे मुंबई दूरदर्शनवर 35 वर्षे वृत्तनिवेदक म्हणून कार्यरत होते. प्रदीप भिडे यांचे स्मितहास्य असलेली मुद्रा,
भारदस्त आवाज, स्पष्ट शब्दोच्चार आणि अत्यंत संयमी, प्रभावी शैली यामुळे त्यांचे
वृत्त सादरीकरण हे नेहमीच कौतुकाचा विषय असे. त्यांची ही शैली त्यांच्या संपूर्ण
कारकिर्दीमध्ये कायम राहिली होती. दीर्घकालीन ते आजारी होते. असे त्यांच्या
सहकाऱ्याने सांगितले. प्रदीप भिडे हे मराठी रंगभूमीशीही संबंधित होते. त्यांच्या
पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. अंधेरी येथील स्मशानभूमीत
त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
COMMENTS