क्राईमनामा Live : गावपातळीवर तळागाळात काम करणाऱ्या राज्यातील 60 हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण आणि दिलासादायक...
क्राईमनामा
Live : गावपातळीवर तळागाळात काम
करणाऱ्या राज्यातील 60
हजार
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण आणि दिलासादायक शासन निर्णय
घेतला आहे. राज्य शासनाकडून किमान वेतन दर लागू केले आहे. ही वेतनवाढ ग्रामपंचायत
कर्मचाऱ्यांना एप्रिल 2022
पासून
मिळणार आहे.
कामगार
कायद्याच्या नवीन धोरणानुसार किमान वेतन मिळावे, अशी ग्रामपंचायत
कर्मचाऱ्यांची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित होती. किमान वेतनवाढ समितीचे
अध्यक्ष रघुनाथ कुचिक यांचे समितीने महाराष्ट्र शासनाला सुधारित किमान वेतन वाढ
मसुदा अहवाल सादर केला होता. यामध्ये वेतनवाढ करण्याबाबत शिफारस करण्यात आली होती.
तसेच
राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी, सुधारित किमान वेतन
लागू करणे, निवृत्ती
वेतन देणे आणि इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी
युनियनने 9 मार्च
2022 ला राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांनी विधानभवनावर निर्धार मोर्चा
काढला होता. या मोर्चात हजारोंच्या संख्येने ग्रामपचायत कर्मचारी सहभागी झाले
होते.
परंतु
आता राज्य शासनाने किमान वेतन दर लागू करण्यासाठी मंजुरी दिल्याने ग्रामपंचायत
कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 61 प्रमाणे ग्रामपंचायतीला
त्यांच्या आवश्यकतेनुसार कर्मचारी नेमण्याचे व त्यांचे वेतन ठरविण्याचे अधिकार
आहेत. त्यानुसार उद्योग , उर्जा
व कामगार विभागाच्याच्या मंत्रालयाकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन दर
लागू करण्यात आले आहेत.
ग्रामपंचायत
कर्मचाऱ्यांना किमान वेतन दर लागू केल्यानंतर ग्रामपंचायतच्या लोकसंख्येनुसार कुशल
/ अर्धकुशल / अकुशल / असे 3 टप्पे करण्यात आहे असून असा
मिळणार पगार….
परिमंडळ
–
1 : 10,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या
ग्रामपंचायतींचे क्षेत्र :-
परिमंडळ
–
2 : 5,000 ते 10,000 लोकसंख्या
असलेल्या ग्रामपंचायतींचे क्षेत्र :-
परिमंडळ
–
3 : 5,000 पर्यन्त लोकसंख्या असलेल्या
ग्रामपंचायतींचे क्षेत्र :-
कर्मचाऱ्यांना एप्रिल 2022 पासून हे किमान वेतन दर लागू करण्यात आले आहे.
शासन
निर्णय येथे पहा :-
COMMENTS