सांगली: सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ (ता. मिरज) एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या सर्वा...
सांगली: सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ (ता. मिरज) एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या सर्वांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
नरवाड रोड अंबिका नगर चौंडजे मळा आणि हॉटेल राजधानी कॉर्नर या दोन ठिकाणी 9 जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. पशुवैद्यकीय डॉक्टर माणिक यल्लप्पा वनमोरे आणि त्यांचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे यांच्यासह दोघांच्या आई, पत्नी आणि मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे. डॉ. माणिक यल्लप्पा वनमोरे पत्नी रेखा माणिक वनमोरे,आई आकताई यल्लप्पा वनमोरे, मुलगी प्रतिमा माणिक वनमोरे, मुलगा आदित्य माणिक वनमोरे, पुतण्या शुभम पोपट वनमोरे राजधानी हॉटेलजवळ तर दुसरीकडे घरात डॉ. माणिक यांचा भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे, संगीत पोपट वनमोरे, मुलगी अर्चना पोपट वनमोरे यांचे मृतदेह आढळून आले आहेत.
घटनास्थळी पोलिस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपविभागीय पोलिस अधीक्षक अशोक वीरकर, पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे यांनी घटनास्थळी जाऊन भेट घेतली. मिरज येथील शासकीय रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन सुरू आहे. अहवाल हाती आल्यानंतर नऊ जणांच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे हे समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.
COMMENTS