चंदीगड (पंजाब): सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या आठ शूटर्सची पोलिसांना ओळख पटली आहे. यातील दोन शूटर महाराष्ट्राचे, दोन हरि...
चंदीगड (पंजाब): सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या आठ शूटर्सची पोलिसांना ओळख पटली आहे. यातील दोन शूटर महाराष्ट्राचे, दोन हरियाणाचे, तीन पंजाबचे आणि एक राजस्थानचा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व शूटर लॉरेन्स बिश्नोई टोळीचे आहेत. या शूटर्सच्या शोधात पंजाब पोलिसांनी संबंधित राज्यांच्या पोलिसांशी संपर्क साधून त्यांची मदत घेतली आहे. पंजाब पोलिस शूटरच्या शोधात हरियाणा-पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रात छापे टाकले आहेत. पंजाब पोलिसांनी संदीप उर्फ 'केकडा' नावाच्या व्यक्तीला मानसा येथून अटक केली आहे. सिद्धू मुसेवालाचा चाहता म्हणून केकडानेच हे कृत्य केल्याचा पोलिसांचा दावा आहे.
पाहा नावे...
तरनतारन येथील मनप्रीत मनू आणि जगरूपसिंग रूपा, भटिंडातील हरकमल उर्फ रानू, सोनीपत येथील प्रियव्रत फौजी आणि मनजीत भोलू, सौरव महाकाल आणि संतोष जाधव (पुणे, महाराष्ट्र) आणि राजस्थानमधील सीकर येथील सुभाष बानोदा यांचा समावेश असलेल्या शूटर्सची ओळख पटली आहे. या सर्व शूटर्सची फोटो प्रसिद्ध झाली आहेत. याच शूटर्संनी 29 मे रोजी मानसा येथे सिद्धू मुसेवाला यांची हत्या केल्याचा पंजाब पोलिसांना संशय आहे. हे सर्व शूटर तीन दिवसांपूर्वी कोटकपुरा महामार्गावर जमले होते. त्यांच्यासोबत आणखी दोन जणही होते. त्यांचीही ओळख पटवली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS