सहसंपादक- प्रा. प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी येथील नंबरवाडीतील 30 आदिवासी कुटुंबांना रोटरी क्लब ना...
सहसंपादक- प्रा. प्रविण
ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी येथील नंबरवाडीतील 30 आदिवासी कुटुंबांना रोटरी क्लब नारायणगावच्या वतीने रोटरी हॅपी फॅमिली किटचे वाटप करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब नारायणगावचे अध्यक्ष मंगेश मेहेर यांनी दिली.
सुरू होत असलेल्या पावसाळ्याचे औचित्य साधून अनोख्या पद्धतीने "रोटरी हॅपी फॅमिली किट वाटप " कार्यक्रमानिमित्त आदिवासी समाजातील मोलमजुरी करणाऱ्या,गरीब,गरजू कुटुंबांची गरज ओळखून आवश्यक वस्तूंचे रोटरी हॅप्पी फॅमिली किट वाटप करून आदिवासी कुटुंबांच्या चेहऱ्यांवर खरा आनंद निर्माण करण्यातआला.
या रोटरी हॅप्पी फॅमिली किटमध्ये बायोमास कुक स्टोव्ह, सोलर लॅम्प, मोठी प्लास्टिक ताडपत्री,मोठी प्रवासी बॅग,प्रथमोपचार पेटी,2 डस्ट बीन्स,2 नॅपकिन्स,५ साबण, सॅनिटरी पॅडस पॅकेट,४ फेस मास्कस आदी गृहोपयोगी असलेले सुमारे ४००० रुपये किमतीचे स्वतंत्र किट सर्व ३० आदिवासी कुटुंबांना रोटरी भेट स्वरूपात देण्यात आले.
याप्रसंगी नारायणगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष मंगेश मेहेर,पुना डाउनटाऊन रोटरी कलबच्या माजी अध्यक्षा व डिस्ट्रिक्ट सिनर्जी डायरेक्टर पल्लवी साबळे, पुणे ईस्ट रोटरी क्लबचे अध्यक्ष विनय पाटील,सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर अभय देसाई,वारुळवाडी गावच्या ग्रामपंचायत सदस्या संगिताताई काळे,फर्स्ट लेडी निर्मला मेहेर,डि.डि.डोके साहेब,मुख्याध्यापक मनोहर भोसले सर,रियाज मोमीन सर,गीता डोके,रेखा ब्रह्मे,प्रिया घोडेकर तसेच रोटरी क्लब नारायणगावचे सर्व सदस्य,आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन वारूळवाडी ग्रामपंचायत सदस्य जंगलभाऊ कोल्हे,सचिन घोडेकर, माऊली लोखंडे,प्रशांत ब्रह्मे यांनी केले.
या स्तुत्य सामाजिक उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्ट,रोटरी क्लब ऑफ पुना डाऊनटाऊन, रोटरी क्लब ऑफ नारायणगाव यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रिया कामत यांनी केले तर योगेश भिडे यांनी आभार मानले.
COMMENTS