पशु सल्ला : पशुपालकांनो पावसाळा सुरु झाला कि जनावरांच्या इतर आजाराबरोबर खुरांचे आजारही दिसू लागतात. वातावरणातील वाढलेली आर्द्रता पावसामुळे स...
पशु सल्ला : पशुपालकांनो पावसाळा सुरु झाला कि जनावरांच्या इतर आजाराबरोबर खुरांचे आजारही दिसू लागतात. वातावरणातील वाढलेली आर्द्रता पावसामुळे सततचा होणारा चिखल खुरांच्या आजारास कारणीभूत ठरतो.
लक्षणे
-जनावरांची
खुरे जास्त वेळ ओली राहिल्याने नरम पडतात. खूर नरम पडल्याने खुरांमध्ये अल्सर तयार
होतात.
-खुरांमध्ये
गळू तयार होण्याची शक्यता वाढते.
-खुरांच्या
आतील भागात असलेल्या लॅमिना या नाजूक भागाचा दाह होतो.
-जास्त
दुधाचे उत्पादन देणाऱ्या गायी-म्हशींमध्ये हा प्रकार दिसून येतो.
-खुरांचा
दाह झाल्याने, जनावराला
बसायला उठायला त्रास होतो. जमिनीवर पाय टेकवत नाहीत.
-खुरांना
भेगा पडल्याने जीवाणू संसर्ग होतो.
-खुरांमधून
सडल्यासारखा वास यायला सुरुवात होते. जनावरं लंगडायला सुरुवात करते.
- खुरांना
तडा जाऊन त्यातून पु बाहेर यायला लागतो.
-वेळेत
उपचार न केल्यास खुरांचा संसर्ग सांध्यापर्यंत वाढत जातो.
उपाय
-सध्या
आपल्याकडे मुक्त संचार पद्धत जास्त प्रचलित आहे. या पद्धतीमध्ये पावसाळ्यात
जनावरांची खुरे नरम पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पावसाळ्याआधी मुक्त
गोठ्यातील शेणखत आणि खुरीखात काढून त्यावर नवीन मुरूम टाकावे.
- प्रतिबंधात्मक
उपाय म्हणून जनावरे उभी राहण्याची जागा कोरडी, चिखलविरहीत राहील याची काळजी
घ्यावी.
-खुराचा
संसर्ग झालेला भाग स्वच्छ धुऊन त्यावर प्रतिजैवकयुक्त मलम लावावे.
-कॉपर सल्फेटचे
द्रावण तयार करून त्यात जनावराचे पाय बुडवल्यास प्रतिबंध करण्यास मदत होते.
-जनावरे
लंगडताना किंवा खुरांना जखम दिसल्यास त्वरित पशुवैद्यकाकडून उपचार करावेत.
COMMENTS