आरोग्य टिप्स : दात आणि हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमचे दात आणि हिरड्या निरोगी ठेवायचे असतील तर तुमच...
आरोग्य टिप्स : दात आणि हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमचे दात आणि हिरड्या निरोगी ठेवायचे असतील तर तुमच्या आहारात पुढील काही गोष्टींचा समावेश केला तर त्याचा नक्कीच फायदा होईल.
१.दूध आणि दुग्धजन्य पदार्थ-
दूध, दही, चीज यासारख्या गोष्टी खाल्ल्याने केस लांब होतात आणि दात मजबूत होतात. दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये भरपूर कॅल्शियम असते, जे हाडांसाठी तसेच दातांसाठी खूप चांगले असते. याशिवाय, दुधामध्ये केसीन देखील असते, जे तोंडातील ऍसिडचा स्तर योग्य प्रमाणात ठेवते. दुसरीकडे, पनीर लाळ बनण्याला चालना देते, जे नैसर्गिकरित्या दात आणि तोंड स्वच्छ करते. दह्यात प्रोबायोटिक्स असतात जे दातांच्या आरोग्यासाठी चांगले असतात.
२.पाणी-
काहीवेळा अन्न दातांमध्ये अडकते. नंतर ते जास्त काळ तसेच राहीले तर तोंडात जीवाणू वाढू शकतात. दातांत अडकलेले अन्न काढून टाकण्यासाठी भरपूर पाणी प्या. नैसर्गिक पीएच समतोल असल्यामुळे पाणी हे चांगले क्लिंजर आहे.
३.गाजर-
गाजरात भरपूर फायबर असते. जेवणाच्या शेवटी एखादे कच्चे गाजर खाल्ल्याने तुमच्या तोंडातील लाळेचे उत्पादन वाढते. फायबरचे प्रमाण जास्त असण्यासोबतच गाजरामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे दातांचे आरोग्य चांगले राहते.
४.कच्चा कांदा-
कच्चा कांदा दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर आहे. कच्च्या कांद्याचा तुकडा तुमच्या तोंडातील, दात आणि हिरड्यांमधील सर्व वाईट बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी चांगले काम करतो.
COMMENTS