आरोग्य टिप्स : हळदीमध्ये अँन्टी व्हायरल आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात. त्याचप्रमाणे हळद आरोग्यवर्धक तसेच सौंदर्यवर्धक देखील आहे. हळदीमध्ये अ...
आरोग्य टिप्स : हळदीमध्ये अँन्टी व्हायरल आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात. त्याचप्रमाणे हळद आरोग्यवर्धक तसेच सौंदर्यवर्धक देखील आहे. हळदीमध्ये असणारे औषधी गुणधर्म शारीरिक आरोग्यासोबतच त्वचेच्या आरोग्यासाठी गुणकारी आहेत. पाण्यात हळद टाकून अंघोळ केल्यास त्वचेसाठी अनेक फायदे होतात. जाणून घ्या हळदीच्या पाण्याने अंघोळ केल्याचे फायदे
त्वचा चमकदार होते
हळदीच्या
पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा उजळ, नितळ आणि चमकदार होते.
त्वचेच्या जखमा बऱ्या होतात
हळदीमध्ये
आढळणारे कर्क्यूमिन जळजळ आणि ऑक्सिडेशन कमी करून जखमा बरे करण्यास मदत करते.
त्यामुळे पाण्यात हळद टाकून अंघोळ केल्याने त्वचेच्या जखमा बऱ्या होतात.
त्वचेचा दाह कमी होतो
हळदीमध्ये
अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे पाण्यात हळद टाकून अंघोळ
केल्याने त्वचेचा दाह कमी होतो.
त्वचेवरील बॅक्टेरिया नष्ट
होतात
हळद
ही नैसर्गिक जंतुनाशक आहे. पाण्यात हळद टाकून अंघोळ केल्याने त्वचेवरील बॅक्टेरिया
नष्ट होतात.
COMMENTS