आरोग्य टिप्स : आपली त्वचा तजेलदार , सुंदर beautiful skin व्हावी अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते आणि खरे सांगायचे तर ते अवघड काम नाही.त्यासाठ...
आरोग्य टिप्स : आपली त्वचा तजेलदार, सुंदर beautiful skin व्हावी अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते आणि खरे सांगायचे तर ते अवघड काम नाही.त्यासाठी आपण काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.ग्लोइंग त्वचा मिळविण्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही, फक्त स्वतःची काळजी घ्या काही सौंदर्य टिप्स दैनंदिन जीवनात अंगिकारा.
तजेलदार
त्वचेचा दावा करणारे अनेक प्रोडक्ट्स बाजारात उपलब्ध असले. तरी प्रत्येकाच्या
त्वचेला हे प्रोडक्ट्स सुट होतील असे नाही. त्यामुळे यासाठी आपण काही घरगुती उपाय
करू शकतो. चेहऱ्यासाठी काय करावे ते जाणून घेऊया.
1.चांगली झोप घ्या
दिवसभर काम करणे, रात्री उशिरापर्यंत जागी राहणे आणि 8 तास पुरेशी झोप न घेणे हे तुमच्या त्वचेसाठी चांगले नाही. त्याचा तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. पुरेशी झोप न मिळाल्याने सकाळी तुमचे डोळे सुजतात. हे चक्र असेच सुरू राहीले तर काही दिवसांतच तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसू लागतील. तुम्हाला थकवा जाणवेल आणि तुमची त्वचा निस्तेज दिसेल. झोपेदरम्यान शरीरातील पेशींचे पुनरूज्जीवन होत असते, त्यामुळे पुरेशी झोप आवश्यक आहे.
2. पाणी प्या –
मुबलक पाणी
आपली त्वचा चमकण्यास मदत करते. आपल्या शरीरातील विषारी द्रव्य काढून टाकते आणि
शरीरात नवीन पेशी बनण्यास चालना देते. आपल्याला हवे असल्यास, आपण आपल्या
पाण्यात विविध आरोग्यदायी पदार्थांचा वापर करू शकता. अशा प्रकारे पाण्याचे फायदे
देखील वाढतील. सकाळी उकडलेल्या पाण्यात चिमूटभर दालचिनी मिसळून पिऊ शकता. यामुळे
वजन कमी होण्यास मदत होईलच, शिवाय तुम्हाला ग्लोइंग स्किनही मिळेल.याशिवाय तुम्हाला हवे
असल्यास स्ट्रॉबेरीचा रस पाण्यात मिसळून पिऊ शकता. याचे नियमित सेवन केल्याने
चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात आणि चेहऱ्यावर चमक येते.
3. व्यायाम – नियमित व्यायाम करा
व्यायामाचा
अर्थ फक्त वजन कमी करणे नाही,
तर शरीराला आकार आणणे आणि
चेहऱ्यावर ग्लो आणणे असा आहे. व्यायामाने चेहऱ्याची चमक वाढते आणि मनही प्रसन्न
होते. इतकेच नाही मूडही सुधारतो. शरीर थकते आणि चांगली झोपही येते. जे चेहऱ्याच्या
त्वचेसाठी खूप महत्वाचे आहे. सूर्यनमस्कार, चालणे, सायकल चालवणे, जॉगिंग, स्किपिंग, डान्सिंग हे
व्यायाम त्वचेला चमकदार बनवण्यासाठी उत्कृष्ट आहेत. बाकी काही नाही तर किमान रोज
एक ब्रिस्क वॉक जरूर करा. याशिवाय तुम्ही काही फेशिअल एक्ससाईज रोज फक्त ५ मिनिटे
केलीत तर महिनाभरात तुम्हाला तुमचा चेहरा तजेलदार दिसू लागतो.
4.योगाचा सराव
तुमची त्वचा
चमकदार होण्यासाठी योगा महत्वाची भूमिका बजावतो. योगामुळे तुमच्या त्वचेचे स्नायू
मजबूत होतात. योगासनांमुळे शारीरिक व्यायामासोबतच तुम्हाला मानसिक शांतता मिळते.
जोपर्यंत तुम्ही आतून निरोगी होत नाही तोपर्यंत समाधान आणि शांती मिळणार नाही.
चेहऱ्यावर चमक आणणाऱ्या चक्रासन, सर्वांगासन, हलासन, शिर्षासन आणि प्राणायाम या आसनांचा सराव करावा. या आसनांमुळे शरीरातील ऑक्सिजन आणि रक्ताचा प्रवाह वाढतो, ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते. या योगासनांमुळे सुरकुत्या कमी होतात. त्वचेचा निस्तेजपणा कमी होतो. चमकदार त्वचा मिळविण्यासाठी ते आवश्यक आहे.
5.साबण वापरू नका
साबण
वापरल्याशिवाय तुम्हाला तुमची त्वचा स्वच्छ वाटत नाही. पण तुम्हाला माहित आहे का
की साबणाचा जास्त वापर करणे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी चांगले नाही.
साबणांमध्ये काही रसायने असतात,
ज्यामुळे त्वचा निर्जीव बनते.
इतकेच नाही तर तुमची त्वचा कोरडी होते, त्वचेतील नैसर्गिक तेल आणि सीबम
काढून टाकते आणि आर्द्रता काढून टाकते. त्वचेची पीएच पातळी असंतुलित होते आणि
त्वचेला त्रास होऊ लागतो. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही साबणाऐवजी घरगुती वस्तू
वापरून तुमच्या चेहऱ्याची त्वचा निरोगी ठेवू शकता. बाजारात काही हर्बल फेसवॉश
देखील उपलब्ध आहेत. आपल्या त्वचेसाठी योग्य असे उत्पादन तुम्ही निवडू शकता.
क्राईमनाम Live टिप : या लेखातील माहिती ही सामान्य
माहितीवर आधारीत असून या माहितीशी क्राईमनामा Live संपादकीय मंडळ व कायदेशीर सल्लागार जबाबदार नाहीत. तरी आपण
आरोग्यविषयक माहिती जाणून घेण्यासाठी जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
COMMENTS