क्राईमनामा Live जुन्नर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया विद्यार्थी संघटनेचे माजी कार्यकर्ते सोमनाथ ढेंगळे याचे वयाच्या 30 व्या वर्षी दु:खद न...
क्राईमनामा Live जुन्नर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया विद्यार्थी संघटनेचे माजी कार्यकर्ते सोमनाथ ढेंगळे याचे वयाच्या 30 व्या वर्षी दु:खद निधन झाले. प्राथमिक शिक्षण आश्रम शाळेत झाले पुढे शिक्षणासाठी जुन्नर श्री शिव छत्रपती महाविद्यालयात पदवी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. पुढे पुणे विद्यापीठातून एम.ए. सायकॉलॉजी पुर्ण केले. त्याबरोबर विद्यार्थी संघटनेच्या लढ्यात सक्रिय सहभाग होता. कॉलेज मध्ये स्नेहसंमेलनात वेशभूषा मध्ये केलेला महात्मा गांधींच्या रोल मुळे कॉलेज मध्ये सर्वपरिचित होते.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय इमारत लढा, घोडेगाव प्रकल्प अधिकारी यांना तीन दिवस घेराव आंदोलन यामध्ये पुढाकार होता. पुढे स्पर्धा परीक्षेची तयारी करत चांगला अभ्यास केले. परंतु यशस्वी न झाल्याचे दुःख न बाळगता विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळाले पाहिजे, या हेतूनेच जुन्नर मध्ये चळवळीतील मित्रासोबत परिवर्तन अकॅडमी स्थापना केले आणि 2015 पासून उत्तम प्रकारे अध्यपनाचे काम केले.
त्यांचे इंग्रजी आणि मराठी चांगले प्रभुत्व होते. अनेक विद्यार्थी त्यानी घडवले. जुन्नर मध्ये स्पर्धा परीक्षेची पुस्तके मिळत नव्हती म्हणून सक्सेस बुक सेंटर ची निर्मिती केली आणि तालुक्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या व विद्यार्थ्यांना मापक दारात उपलब्ध करून दिले.
त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ, वहिनी आणि मोठा मित्र परिवार आहे.
COMMENTS