नवी दिल्ली: महाराष्ट्रातील भाविकांची बोलेरो गाडी थेट दरीत कोसळली. या अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झाला असून , 10 जखमी झाले आहेत. उत्तरका...
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील भाविकांची बोलेरो गाडी थेट दरीत कोसळली. या
अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झाला असून, 10 जखमी झाले आहेत. उत्तरकाशीतील यमुनोत्री
राष्ट्रीय महामार्गावर स्यानाचट्टी जवळ गुरुवारी (ता.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मदत आणि
बचावकार्य सुरू करण्यात आले. एसडीआरएफच्या टीमने 10 जणांना रेस्क्यू केले आहे. अपघातातील जखमींना
तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील भाविक
बोलेरो गाडीने गुरुवारी सायंकाळच्या सुमारास बडकोटच्या दिशेने निघाले होते. त्याच
दरम्यान वाटेत त्यांच्या गाडीला अपघात झाला. यमुुुनोत्रीपासून काही किलोमीटर अंतरावर
असताना बोलेरो गाडी दरीत कोसळली. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त
मोटारीमध्ये 13 प्रवासी होते. दोन पुरुष आणि एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर इतर 10 जण जखमी झाले आहेत.
पुढील तपास करत आहोत.
COMMENTS