कोल्हापूरः दारूच्या नशेत असलेल्या पतीची गुप्तांग कापून तसेच गळा आवळून पत्नीने हत्या केल्याची धक्कादायक घटना मांगुरवाडी (ता. शाहुवाडी) ...
कोल्हापूरः दारूच्या नशेत
असलेल्या पतीची गुप्तांग कापून तसेच गळा आवळून पत्नीने हत्या केल्याची धक्कादायक
घटना मांगुरवाडी (ता. शाहुवाडी) येथे घडली आहे. वंदना प्रकाश कांबळे (वय 50) असे या पत्नीचे नाव
असून, प्रकाश पांडुरंग
कांबळे (वय 52) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पतीच्या हत्येनंतर सुरुवातीला तिने आत्महत्या
केल्याचा बनाव रचला नंतर पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा कबुल केला. पोलिस निरीक्षक
विजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार,
'मृत प्रकाश पांडुरंग कांबळे आणि त्याची पत्नी वंदना
प्रकाश कांबळे दोघेही मूळचे शाहूवाडी तालुक्यातील लोळाणे गावचे आहेत. मात्र, गेल्या काही
महिन्यांपासून ते शाहूवाडी तालुक्यातीलच नांदगाव पैकी मांगुरवाडी येथे एकाच्या
शेतावर सालगडी म्हणून कामाला होते. याठिकाणी पती नेहमीच दारूच्या नशेत असायचा.
शिवाय, पत्नीच्या अनैतिक
संबंधावरून तिला नेहमी मारहाण करायचा. काल मध्यरात्री दारूच्या नशेत असताना पुन्हा
तिला त्रास दिल्याने तिने त्याची निर्घृण हत्या केली. दगडावर डोके आपटून गळा आवळून
आणि पतीच्या गुप्तांगावर सुरीने वार करून तिने निर्दयीपणे खून केला. या घटनेनंतर
पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून,
पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.'
दरम्यान, वंदना कांबळे स्वतः शाहूवाडी पोलिसांत जाऊन हजर झाली आणि आपल्या पतीने आत्महत्या केली असल्याचे तिने माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला त्यानंतर मृतदेह तपासणीसाठी मलकापूर येथे पाठवला तर त्या ठिकाणी पतीच्या डोक्यात मोठी जखम तसेच गुप्तांगावर सुरीने अथवा चाकूने वार केल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच तिने आपला गुन्हा कबुल केला.
COMMENTS