पाटणा (बिहार): सासरा आणि सुनेचे अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. दोन मुलांची आई असलेल्या सून सासर्यासोबत पळून गेली आहे. संबंधित घटना प...
पाटणा (बिहार): सासरा आणि सुनेचे अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. दोन मुलांची आई असलेल्या सून सासर्यासोबत पळून गेली आहे. संबंधित घटना परसा बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुरथौल गावात घडली आहे.
पतीने परसा बाजार पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली पण पतीचा मृत्यू झाला आहे.
पतीने पोलिसांना सांगितले की, 'माझ्या पत्नीचे चुलत सासऱ्यासोबत अनैतिक संबंध होते. मी विरोध केला असता काकाने मला जीवे मारण्याची धमकी दिली. तीन दिवसांपूर्वी पत्नी दोन मुलांना सोडून चुलत सासऱ्यासोबत पळून गेली.' पोलिस ठाण्यातून परतलेल्या पतीने शुक्रवारी विष प्राशन केले. कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी या पळून गेलेल्या पत्नीच्या पतीचा मृत्यू झाला आहे.
नातेवाईकांनी सांगितले की, 'कुंदन सिंग पत्नी आणि दोन मुलांसोबत कुरथौल येथे राहत होता. यावेळी कुंदनचे गावातील काका जसवंत सिंह त्यांच्या घरी येत असत. घरी येण्याच्या ओघात कुंदनच्या पत्नीचे काका जसवंत सिंग यांच्याशी प्रेमसंबंध सुरू झाले. दोघांच्या नात्याची संपूर्ण गावात चर्चा होऊ लागली. जसवंत सिंगच्या पत्नीसोबतच्या अवैध संबंधांमुळे तो खूप नाराज होता. पोलिस स्टेशनमधून घरी आल्यावर त्याला परिसरातील लोकांचे टोमणे सहन न झाल्यानं त्याने विषारी द्रव्य प्राशन केले.
हॉस्पिटलमध्ये कुंदनने पोलिसांना जबाब दिला की, 'माझ्या पत्नीचे जसवंत सिंगसोबत अनैतिक संबंध होते आणि ती काकासोबत पळून गेली. त्यामुळे नाराज होऊन मी विष प्राशन केले आहे. त्याचवेळी कुंदन सिंग यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कुंदनच्या जबानीवरून जसवंत सिंग आणि त्याच्या पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS