पाटणा (बिहार): एरई गावात वधू-वरांनी एकमेकांना वरमाला घालण्यापूर्वीच वधूचा प्रियकर स्टेजवर आला आणि त्याने वराच्या हातून माळ काढून घेत ती प्...
पाटणा (बिहार): एरई गावात वधू-वरांनी एकमेकांना वरमाला घालण्यापूर्वीच वधूचा प्रियकर स्टेजवर आला आणि त्याने वराच्या हातून माळ काढून घेत ती प्रेयसी असलेल्या वधूच्या गळ्यात घातली.
शिवाय, त्यानंतर त्याने नवरीच्या डोक्यावर कुंकूही लावल्यामुळे एकच खळबळ उडाली.
लग्नसोहळ्यादरम्यान अचानक घडलेल्या घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या वऱ्हाडी मंडळींनी प्रियकराला बेदम मारहाण केली. पण, वधूने तिच्या प्रियकराला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. ग्रामस्थांनी प्रियकराला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकारामुळे नवरदेवाकडील नातेवाईक नवरीला न घेताच निघून गेले.
घडलेल्या घटनेबाबत वधूच्या नातेवाईकांना पोलिसांकडे कुठल्याही प्रकारची लेखी तक्रार दिलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी सदर युवकाला ताकीद देऊन सोडून दिले. लग्नसोहळ्यादरम्यान घडलेल्या या अजब घटनेची संपूर्ण परिसरामध्ये चर्चा सुरू आहे.
COMMENTS