सोलापूर: सोलापूर तालुका, पोलिस स्टेशनचे हद्दीतील विजयराज ऑकेस्ट्रा बारवर पोलिसांनी छापा टाकला. एकूण 18 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला...
सोलापूर: सोलापूर तालुका, पोलिस स्टेशनचे हद्दीतील विजयराज ऑकेस्ट्रा बारवर पोलिसांनी छापा टाकला. एकूण 18 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हयाचा तपास नेताजी बंडगर, सहायक पोलिस निरीक्षक, सोलापूर तालुका, पोलिस ठाणे हे करीत आहेत.
26/05/2022 रोजी रात्री सोलापूर तालुका, पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सत्यसाई कार्तिक, परिविक्षाधिन पोलिस अधीक्षक यांना सोलापूर ते बार्शी रोड वरील मौजे नान्नज गांवचे लगत असलेल्या विजयराज आर्केस्ट्रा बारमध्ये काही महिला अंगावर तोकडे कपडे घालून बिभीत्सपणे अश्लिल हावभाव करून संगीताच्या तालावर अश्लील नृत्य करत आहेत, अशी बातमी मिळाली होती. मिळालेल्या बातमीच्या नुसार सत्य साई कार्तिक, परिविक्षाधिन पोलिस अधीक्षक यांनी सोलापूर तालुका, पोलिस स्टेशनमधील पुरूष व महिला पोलिस अंमलदार विजयराज आर्केस्ट्रा बार येथे 27/05/2022 चे 01/00 वा. सुमारास ऑकेस्ट्रा बार मध्ये प्रवेश छापा टाकला. त्यावेळी तेथे 2 महिला त्यांचे अंगावर तोकडे कपडे घालून ऑकेस्ट्रा बार मध्ये संगीताच्या तालावर बार मध्ये आलेल्या ग्राहकांना अश्लिल हावभाव करून, नृत्य करून त्यांना इशारे करीत असताना मिळून आल्या.
महिला, आर्केस्ट्रा बारचे मॅनेजर, कामगार व ग्राहक यांनी संगनमत करून आर्केस्ट्रा बारचे चालक यांनी शासनाने विहीत केलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ आर्केस्ट्रा बार चालू ठेवनू परवान्यातील अटी व शर्तीचा भंग केला आहे म्हणून सोलापूर तालुका, पोलिस स्टेशन मधील पोलिस अंमलदार माधव विश्वनाथ लाखाडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून भादंवि कलम 294,34, महाराष्ट्र पोलिस अधीनियम 33 (1) (डब्यु) प्रमाणे एकूण 18 लोका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा तपास नेताजी बंडगर, सहायक पोलिस निरीक्षक, सोलापूर तालुका, पोलिस ठाणे हे करीत आहेत.
सदर कारवाई तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, हिंमत जाधव, अपर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, अमोल भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी, सोलापूर ग्रामीण उपविभाग याचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सत्य साई कार्तिक, परिविक्षाधिन पोलिस अधीक्षक यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार बाळू राठोड, फैयाज बागवान, पोलिस नाईक गुंड, धुमाळ, महिला पोलिस नाईक सुनीता चवरे, पोलिस अंमलदार विवेक नरळे, अशोक खवतोडे, इंगळे, चापोना राजगुरू, अष्टगी यांनी बजावली आहे.
COMMENTS