पुणे: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकाच्या कडेला उभ्या असलेल्या एका दुचाकीसह दोन कार वाहनांना पाठीमागू...
पुणे: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकाच्या कडेला उभ्या असलेल्या एका दुचाकीसह दोन कार वाहनांना पाठीमागून आलेल्या कंटेनरची धडक बसली.
यावेळी झालेल्या अपघातात तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे बाळासाहेब नामदेव भवर या कंटेनर चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे पुणे-नगर महामार्गावरून निलेश मासळकर हे त्यांच्या ताब्यातील एम एच एम एच १२ एस क्यू ४४८८ वरुन प्रवास करत होते. पुणे दिशेच्या बाजूकडून अहमदनगर बाजूकडे वळण्यासाठी दुभाजकाजवळ थांबलेले असताना त्यांच्या समोर एम एच १२ पी जे ५६२८ हा दुचाकी चालक तर पाठीमागे एम एच १२ आर एफ ७०५६ हि कार थांबलेली होती. समोरून वाहने येत असल्यामुळे सर्व वाहने दुभाजकाजवळ थांबलेली असताना पाठीमागून एन एल ०१ ए डी ९२०५ हा कंटेनर भरधाव वेगाने आला आणि समोरील वाहनांवर आदळला. यावेळी दुचाकीचालक सागर आरगडे हा जखमी होत दोन्ही कार सह दुचाकीचे नुकसान झाले आहे.
घडलेल्या प्रकाराबाबत निलेश शामराव मासळकर (वय ३८ वर्षे रा. जातेगाव खुर्द ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी कंटेनर चालक बाळासाहेब नामदेव भवर (रा. देहूगाव ता. मावळ जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजेश माने हे करत आहेत.
COMMENTS