गुवाहाटी (आसाम): इंडियन ऑईलच्या कार्यक्रमावेळी स्क्रीनवर अचानक पॉर्न फिल्म सुरु झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. तिनसुकियामध्ये गेल्या शनिवारी ह...
गुवाहाटी (आसाम): इंडियन ऑईलच्या कार्यक्रमावेळी स्क्रीनवर अचानक पॉर्न फिल्म सुरु झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. तिनसुकियामध्ये गेल्या शनिवारी हॉटेल मिरानामध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली आणि आसामचे कामगार मंत्री संचय किसान यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
या प्रकरणी तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.
इंडियन ऑईलचा मिथेनॉल मिश्रीत एम १५ पेट्रोलच्या पायलट रोलआऊटचे लाँच करण्यात येत होते. यामध्ये तेली, निती आयोगाचे सदस्य डॉ वीके सारस्वत, कंपनीचे अध्यक्ष एसएम विद्या आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंचावर मोठी स्क्रीन लावण्यात आली होती. इंडियन ऑईलचे एक अधिकारी मंचावर आपले भाषण देत होते. स्क्रीनवर मिथेनॉल मिश्रित पेट्रोल प्रकल्पाची व्हिडिओ क्लिप दाखवली जात होती. प्रोजेक्टर ऑपरेटर व्हिडिओ क्लिप बदलत असताना अचानक प्रोजेक्टरच्या स्क्रीनवर एक अश्लील फिल्म दिसू लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. व्हिडिओ 3-4 सेकंद सुरु होता, ऑपरेटरने घाईघाईने तो बंद केला.
दरम्यान, प्रोजेक्टर ऑपरेटरला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. याबाबत तपास सुरू आहे. पण, घडलेल्या घटनेबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
COMMENTS