क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांश गावांतील बस थांब्यांची अतिशय दुरावस्था झालेली असून, हे बस थांबे अक्षरश मोडक...
क्राईमनामा Live : जुन्नर
तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांश गावांतील बस थांब्यांची अतिशय दुरावस्था
झालेली असून, हे बस थांबे अक्षरश मोडकळीस
आलेले आहेत.
बोतार्डे गावातील
एसटी बस थांब्याची तर अतिशय मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली असून हा बस थांबा मोडकळीस आलेला असून यात पावसाळ्यात
पाणी देखील मोठ्या प्रमाणात गळत असते, प्रवाशांना बसायला देखील यात जाता येत नाही.
या बस थांब्याची अवस्था बिकट असून सध्या पावसाळा पुढ्यात येऊन ठेपला असून या बस
थांब्यावर प्रवाशांना बसायला देखील जागा नसल्याने नाविलाजाने तेथेच आडोशाला उभे
राहावे लागत आहे.
या बस थांब्याच्या
सिमेंट पिलरचे गज देखील बाहेर दिसत आहेत. या गोष्टीकडे कुणाचेही लक्ष नसल्याने खरं तर या अशा बिकट अवस्थेमुळे यात एखादी मोठी
दुर्घटना देखील घडण्याची शक्यता दिसत आहे.. त्यामुळे या बस थांब्याकडे वेळीच लक्ष
देण्याची गरज असून वेळीच डागडुजी करण्याची गरज आहे.
COMMENTS