क्राईमनामा Live : मागील काही दिवसांपूर्वीच कुरकुंडी (ता.संगमनेर) येथील युवकाने बायको नांदायला येत नाही म्हणून चक्क टॉवरवर चढून आंदोलन केले...
क्राईमनामा Live : मागील काही दिवसांपूर्वीच कुरकुंडी (ता.संगमनेर) येथील युवकाने बायको नांदायला येत नाही म्हणून चक्क टॉवरवर चढून आंदोलन केले होते. जोपर्यंत पत्नी येत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचे त्याने उपस्थिताना सांगितले होते आज पुन्हा एकदा केशव काळे (२२ वर्षे) या तरुणाने बायको नांदायला येत नसल्याने पेट्रोलची बाटली घेऊन त्याच टॉवरवर चढला होता.
मात्र त्यानंतर प्रशासन व येथील स्थानिकांनी त्याचा समझोता करत त्याला खाली येण्यासाठी प्रयत्न केले.
या अगोदर देखील या युवकाने दोन वेळेस अशा प्रकारचे पाऊल उचलले होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, केशव काळे या युवकाचे गोद्रे(जुन्नर) येथील मुलीसोबत डिसेंबर २०२१ मध्ये कुरकुंडी घारगाव येथे विवाह झाला होता. पती-पत्नीमध्ये होत असलेल्या वादामुळे त्याची पत्नी माहेरी गोद्रे येथे आई वडिलांकडे राहण्यास आली.
मात्र पोलिस स्टेशनला गेल्यानंतर पुन्हा पत्नीने येण्यास नकार दिल्याने आज पुन्हा हेच पाऊल या तरूणाने उचलले असल्याचे त्याच्या वडिलांनी व त्या तरूणाने सांगितले.
COMMENTS