पुणेः हॉटेल मालकाच्या गल्ल्यावर डल्ला मारून फरार झालेला आरोपीस १२ तासाच्या आत शिवाजीनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबत पोलिस पुढील तपास...
पुणेः हॉटेल मालकाच्या गल्ल्यावर डल्ला मारून फरार झालेला आरोपीस १२ तासाच्या आत शिवाजीनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिवाजीनगर पोलिस ठाणे गु.र. क्र. 69/22 भा द वि कलम 381 मधील आरोपी अजय सुरेश सक्सेना (वय 40, रा. जोगेश्वरी पूर्व, मुंबई) याने हॉटेल रीजेंट, शिवाजीनगर, पुणे या ठिकाणी नोकर म्हणून काम करीत असताना काउंटरमध्ये ठेवलेले रक्कम 22120 रुपये चोरून नेले होते म्हणून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर, पो.ह. बशीर सय्यद, पो.शि. शरद राऊत यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी उपलब्ध असलेले 40 ते 45 सीसीटीव्ही फुटेज व मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नमूद आरोपीतास 12 तासांच्या आत मच्छी मार्केट समोर, दीपा लॉज, रविवार पेठ, पुणे या ठिकाणाहून तपास करून ताब्यात घेऊन अटक केले आहे. अजय सक्सेना या आरोपीकडून दाखल गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी राजेंद्र डहाळे, अप्पर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, प्रियंका नारनवरे, पोलिस उपायुक्त परिमंडळ-01, रमाकांत माने, स.पो.आ विश्रामबाग विभाग, अरविंद माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक,शिवाजीनगर पोलिस ठाणे, पो.नि. गुन्हे विक्रम गौड, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पो.उप.नि. अतुल क्षीरसागर, पो.ह. गुंड, पो.ह. राजपूत, पो.ह. फडतरे, पो.ह. साठे, पो.ना. मेमाणे, पो.शि. राऊत यांनी केली आहे.
COMMENTS