जयपूर (राजस्थान): टोंक जिल्ह्यात एका सरकारी शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. शिक्षकाने पत्नीचा डोळा लागल्यानंतर द...
जयपूर (राजस्थान): टोंक जिल्ह्यात एका सरकारी शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. शिक्षकाने पत्नीचा डोळा लागल्यानंतर दुसऱ्या खोलीत जाऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत हेमराज रेगर हे कंवरपुरा गावातील प्राथमिक विद्यालयात शिक्षक म्हणून काम करत होते. गेल्या तीन महिन्यांपासून ते शारिरीक आजारामुळे त्रासले होते. या आजारामुळे ते तणावाखाली होते. काल रात्री ते आपल्या खोलीत बराच वेळ पत्नीसोबत गप्पा मारत होते. जेव्हा पत्नीला गाढ झोप लागली तेव्हा दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास घेतला.
पत्नी जागी झाली, तेव्हा पती बेडवर नसल्याचे दिसले. त्यांना शोधण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेली. त्यावेळी तेथे पतीला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत पाहून धक्का बसला. पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर नातेवाईक धावत आले. यानंतर पतीला खाली उतरवण्यात आले. पोलिसांच्या चौकशीतून आजारामुळे शिक्षक नैराश्यात गेला होता. यातूनच त्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याची शक्यता समोर येत आहे.
COMMENTS