क्राईमनामा Live : केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालक्यातील आरपीआय पदाधिकारी यांची सदिच्छा भेट घ...
क्राईमनामा Live : केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालक्यातील आरपीआय पदाधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली.
जुन्नर तालुक्यातील माळशेज येथील MTDC येथे सर्व धर्म समभाव मेळाव्याचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले व सीमाताई आठवले आले होते.
यावेळी आरपीआय तालुका अध्यक्ष गौतम लोखंडे, माजी अध्यक्ष पोपट राक्षे, युवक अध्यक्ष मंगेश गायकवाड, बाळासाहेब साळवे, ज्येष्ठ समाजसेवक संभाजी साळवे, गौरीताई सदाकाळ, प्रशांत धोत्रे पत्रकार व विविध मान्यवर उपस्थित होते.
तालुक्यातील आरपीआय पदाधिकारी यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे आदरातिथ्य व सत्कार करण्यात आला.
या वेळी तालुक्यातील विविध भागातील कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
COMMENTS