सहसंपादक- प्रा प्रवीण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील अष्टविनायकांपैकी एक असलेला गिरिजात्मक लेण्याद्रीत सायंकाळी साडेस...
सहसंपादक- प्रा प्रवीण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील अष्टविनायकांपैकी एक असलेला गिरिजात्मक लेण्याद्रीत सायंकाळी साडेसहा नंतर अजूनही टाळेबंदी असल्याचे पाहावयास मिळत आहे त्यामुळे अष्टविनायक परिक्रमा करणाऱ्या भावीक भक्तांना मधून कमालीची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तरी गणेश भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पुरातत्व विभागाने दर्शनाची वेळ वाढवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
पुरातत्व खात्याच्या काहीशा आडव्या भूमिकेमुळे सदर मंदिर सायंकाळी साडेसहा वाजता बंद केले जाते त्यामुळे देशाच्या व महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून लेण्याद्री गिरीजात्मकाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना लेण्याद्री गिरीजात्मकाचे दर्शन घेऊ दिले जात नाही म्हणून काही भाविकांची अष्टविनायक यात्रा सफल होत नसल्याने गणेश भक्त व भावीकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अष्टविनायकांपैकी इतर काही मंदिरे रात्री साडेदहा पर्यंत चालू असतात सध्या दिवस मोठा असला तरी लेण्याद्री मंदिर पुरातत्त्व विभागाच्या भूमिकेमुळे लवकर बंद होते त्यामुळे दूरवरून आलेल्या गणेश भक्तांना व भाविकांना दर्शन न घेता परतावे लागते यामुळे ज्येष्ठ नागरिक, सहलीसाठी आलेले विद्यार्थी ,अष्टविनायक परिक्रमा करणारे नागरिक यांच्यामधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे
सध्या उन्हाचा तडाखा जास्त असून वातावरणाचा पारा हा अतिशय वाढलेला आहे शा परिस्थितीत लेण्याद्री गिरीजात्मक यांचे दर्शन घेण्यासाठी जवळपास 350 पायर्या चढून डोंगरावर जावे लागते उन्हाच्या वेळेस ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना डोंगर सोडून देण्याचे दर्शन घेणे कठीण असल्याने बहुतांशी भाविक हे सायंकाळी दर्शन घेण्यासाठी प्रयत्न करतात परंतु पुरातत्त्व विभागाने मात्र वेगळी भूमिका घेऊन मंदिर साडेसहा वाजता बंद करण्याचा निर्णय घेतला याचा फटका हजारो भाविकांना बसत आहे याकडे मात्र पुरातत्व विभागाचे किंचितही लक्ष नाही तरी मंदिराची वेळ सायंकाळी रात्री साडेदहापर्यंत असावी अशी भावना नागरिकांची पर्यटकांची व गणेश भक्तांचे आहे
प्रतिक्रिया चौकट :- लेण्याद्री गिरीजात्मक दर्शनासाठी भाविकांकडून प्रति व्यक्ती पंचवीस रुपये आकारले जातात तसेच सध्या लेण्याद्री दर्शनाची वेळ सायंकाळी साडेसहा पर्यंतच आहे असे असताना देखील सदर प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधींकडून मात्र फारसा पाठपुरावा केला जात नसल्याने नागरिकांमधून खंत व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया :-
अष्टविनायक दर्शन करणारे लोक संपूर्ण आठही
गणपतींची परिक्रमा करत असतात. ही परिक्रमा करत असताना दोन दिवसात आठही गणपतींचे
दर्शन पूर्ण करतात . परंतु अनेकदा लेण्याद्री ला आल्यावर पुरातत्व विभागाचे गेट
बंद असल्यामुळे त्यांचा भ्रमनिरास होतो. त्यामुळे पुरातत्व विभागामार्फत सकाळी
किमान साडेपाच वाजता गेट उघडले जावे व सायंकाळी आठ वाजता बंद करावे. असे केल्यास
भाविकाना तसेच गणेशभक्तांना सोयीचे होईल.-
जितेंद्र बिडवई सचिव लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट
COMMENTS