पुणेः गॅस सिलेंडरचे दर गगणाला भिडले असून, भरलेल्या गॅससिलेंडर मधील गॅस चोरी करणार्या (पल्टीसिलेंडर) आरोपीला युनिट २ गुन्हे शाखेने जेरबंद...
पुणेः गॅस सिलेंडरचे दर गगणाला भिडले असून, भरलेल्या गॅससिलेंडर मधील गॅस चोरी करणार्या (पल्टीसिलेंडर) आरोपीला युनिट २ गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
१७/०५/२०२२ रोजी युनिट २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलिस अधिकारी व अंमलदार गॅस सिलेंडर मधील गॅस चोरुन काढून काळाबाजार करणा-याचा गुप्तपणे शोध घेत होते. खबऱयायाकडुन माहिती मिळाली की, एकजण श्री गुरुसिंग गुरुद्वारा पार्कींग, दारुवाला पुल, पुणे येथे टेंम्पो मधून
भरलेले गॅस सिलेंडर रिकामे सिलेंडर मध्ये नळीद्वारे अनधिकृतरित्या भरुन (पल्टी सिलेंडर) लोकांच्या जिवितास धोका व मालमत्तेस धोका निर्माण होईल असे कृत्य करुन त्या गॅससिलेंडरची विक्री करीता गॅसचा काळाबाजार करत आहेत. सदर ठिकाणी छापा टाकुन तेथे हजर असलेल्याला ताब्यात घेतले. तुषार ज्ञानदेव चांदगुडे (वय २७ वर्षे, मु.पो. सुपा, ता. बारामती, जि.पुणे) असे त्याचे नाव आहे.
टेम्पोची पाहणी केली असता त्यामध्ये ठेवलेले एकुण १५ सिलेंडर पैकी, भारत गॅस कंपनीचे ४ नग सिलेंडर (१९ लिटर प्रत्येकी) भरलेले व ११ नगरिकामे भारत गॅस कंपनीचे सिलेंडर मिळून आले. तसेच सिलेंडर पल्टी करण्यासाठी वापरात असलेल्या ४ नग स्टीलच्या नळ्या असा एकुण किं रु ३७,५००/- चा माल व किं.रु.२,००,०००/- चा टेम्पो असा सर्व मिळूण एकुण किं. रु. २,३७,५००/- चा माल पोलिसांनी पंचनाम्याने जप्त केला आहे. सदर व्यक्तीविरुध्द फरासखाना पोलिस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजि.क्रं.८०/२०२२ कलम २८५ भादंविसह जीवनावश्यक वस्तुकायदा, १९५५ चेकलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची दोन दिवस पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अभिताभ गुप्ता, सह पोलिस आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक,अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, रामनाथ पोकळे, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे - १, पुणे शहर गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-२ कडील पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलिस उप निरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलिस अंमलदार किशोर वग्गु, चेतन गोरे, गजानन सोनूने, मितेश चोरमोले, साधना ताम्हाणे यांनी केली आहे.
COMMENTS