पुणेः मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाल्यानंतर एका पोलिसकाकाने चिमुकलीला खांद्यावर घेऊन रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतले होती. संबंधित व्हिडि...
पुणेः मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाल्यानंतर एका पोलिसकाकाने चिमुकलीला खांद्यावर घेऊन रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतले होती. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
शिवाय, पोलिसकाकावर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. त्या पोलिसकाकाचा आज (रविवार) गृहमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समीर बागसिराज असे त्या जिगरबाज पोलिसकाकाचे नाव आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरील वारजे पुलाजवळ चारचाकी वाहनाचा अपघात झाला होता. अपघातग्रस्त चारचाकी वाहना मध्ये आठ वर्षाची मुलगी जखमी झाली होती. जखमी झालेल्या आठ वर्षीय मुलीला तातडीने वाहतूक पोलिस कर्मचारी समीर बागसिराज यांनी दवाखान्यात दखल केले होते. त्यामुळे वेळीच उपचार झाले व पुढील अनर्थ टळला ही बातमी सगळीकडे प्रसिद्ध होताच बागसिराज यांचे सर्व स्तरातून कौतुक झाले.
१ मे महाराष्ट्र दिनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी त्यांचा पुणे येथे सत्कार केला. समीर बागसिराज यांना रुग्णालयात पोहोचण्यासाठी रिक्षाचालक राम नवले यांनी देखील मदत केली होती. याप्रसंगी त्यांचाही सत्कार करण्यात आला. समीर आणि राम यांच्यासारख्या लोकांमुळेच पुरोगामी महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा कायम आहे. तो पुढेही राहील, असे वळसे पाटील यावेळी म्हणाले.
COMMENTS