आरोग्य टिप्स : दुधाला पूर्ण अन्न म्हणतात त्यामुळे अनेकांच्या आहारात दुधाचा समावेश असतो. काही लोक फक्त दूध पितात तर, काही लोक दुधाची चव गोड...
आरोग्य टिप्स : दुधाला पूर्ण अन्न म्हणतात त्यामुळे अनेकांच्या आहारात दुधाचा समावेश असतो. काही लोक फक्त दूध पितात तर, काही लोक दुधाची चव गोड लागावी म्हणून त्यात साखर टाकतात. साखरेऐवजी जर दुधात खजूर भिजवून पिल्यास अनेक फायदे होतात.
सकाळी कोमट दुधात एक ते दोन खजूर भिजवून ते दुध सेवन करा.साखरेला पर्याय म्हणूनही खजूरचा चांगला उपयोग होतो. खजूर अथवा खारीक बऱ्याचदा उपवासाला खाल्ले जातात. जाणून घ्या दुधात खजूर भिजवून पिण्याचे फायदे –
१.रक्त वाढीसाठी उपयुक्त
शरीरात रक्ताची कमतरता असल्यास खजूर भिजवून मिसळून प्यावे. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन बरोबरच रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते.
२.शरीराची झीज भरून निघते
दुधात खजूर भिजवून पिल्यास शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे शरीराची झीज भरून निघते. थकवा, ताणतणाव कमी होतो.
३.रक्तातील अशुद्ध घटक निघून जातात
दुधात खजूर भिजवून पिल्यास रक्त शुद्ध राहण्यास मदत होते. रक्तातील विषारी आणि अशुद्ध घटक निघून जातात.
४.पचनसंस्था सुरळीत कार्य करते, बद्धकोष्ठता कमी होते
दूध आणि खजूरच्या नियमित सेवनानारे पचनसंस्थेशी निगडित आजार कमी होतात. अन्न पचनाच्या क्रियेला चालना मिळते. पोटात गॅस निर्माण होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. तसेच बद्धकोष्ठता कमी होते.
५.शांत झोप येण्यास मदत करते
रात्री शांत झोप नसेल तर दररोज दुधात खजूर भिजवून सेवन करा.
६.चरबी घटवण्यासाठी उपयुक्त
दुधात खजूर भिजवून पिल्याने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. चरबी कमी झाल्याने वजन देखील कमी होते.
७.कफच्या त्रासावर गुणकारी
दूध आणि खजूरचे मिश्रण थंड वातावरणात शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता निर्माण करण्यास मदत करते. यामुळे कफचा त्रास कमी होतो.
COMMENTS