आरोग्य टिप्स : व्हिटॅमिन-ई (Vitamin-E) मध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट घटक असतात. त्यामुळे आहारात व्हिटॅमिन-ई युक्त पदार्थांचा समावेश केल...
आरोग्य टिप्स : व्हिटॅमिन-ई (Vitamin-E) मध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट घटक असतात. त्यामुळे आहारात व्हिटॅमिन-ई युक्त पदार्थांचा समावेश केला तर केसांचे आणि त्वचेचेही आरोग्य सुधारते. जाणून घ्या आहारात कोणत्या व्हिटॅमिन-ई युक्त पदार्थांचा समावेश करावा –
१.बदाम (Almonds) दररोज सकाळी सकाळी ४-५ भिजवलेले बदाम खावेत.
बदाममध्ये व्हिटॅमिन-ई आणि न्यूट्रिएंट्सचे प्रमाण भरपूर असते. केस, डोळे, त्वचा आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी बदाम उपयुक्त आहे. तसेच बदाम खाल्याने कोलेस्ट्रॉल पातळीही नियंत्रणात राहते.
२.अवोकडो (Avocado)
अवोकडोचे सेवन आपण जवळपास करताच नाही; परंतु अवोकडोमध्ये व्हिटॅमिन-ई मोठ्या प्रमाणात असते. तसेच यामध्ये साखरेचे प्रमाण अतिशय कमी असते.अवोकडोमध्ये मोनो सॅच्युरिटेड फॅट यात मोठ्या प्रमाणात असतात. ते कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यासह हृदयविकाराचा धोका कमी करतात.
३.पालक (Spinach)
पालकच इम्युनिटी वाढवण्यास मदत करते. अनेक पोषक घटकांनी भरलेल्या पालकामध्ये व्हिटॅमिन-ई देखील पुरेसं असल्यामुळे नियमित आहारात पालकचा समावेश करायलाच हवा.
४.सूर्यफुलाच्या बिया (Sunflower seeds)
शरीरातील व्हिटॅमिन ई ची कमतरता भरून काढण्यासाठी सूर्यफुलाच्या बियांचा आहारात समावेश करावा. तसेच नियमित सेवन केल्यामुळे केस गळणे, पांढरे होणे आणि रुक्षपणाची या सारख्या समस्या कमी होतात.
५.शेंगदाणे (Peanuts)
शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन-ई चे प्रमाण मुबलक प्रमाणात असते. जर का शेंगदाणे भिजवून खाल्ले तर ते जास्त लाभदायक असतात. दोन जेवणांच्या मधल्या वेळेत मुठभर शेंगदाणे खाणं तुमच्या केस आणि त्वचेसाठी फायदेशीर राहील.
६.किवी (Kiwi)
किवी फळामध्येदेखील व्हिटॅमिन-ईचे प्रमाण भरपूर असतं. तसेच किवीमधील साखरेचे विघटन होताना शरीरात ॲसिड तयार होत नाही. या फळामधील साखर ही शरीरात अल्केलाईनचे काम करते. ज्यामुळे शरीराला ऑक्सिजन मिळण्यास मोठ्या प्रमाणात मदत करते
७.ब्रोकोली (Brocolli)
ब्रोकली ही अत्यंत स्वादिष्ट भाजी आहे. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन-ईचे प्रमाण मुबलक आहे. त्यामुळे आहारात नियमित ब्रोकोलीचा समावेश करावा. तुम्ही सलाड, सूप किंवा कढी करून ब्रोकलीचा आहारात समावेश करू शकता. ब्रोकलीतील फायटोकोमिक्लस आणि अँटीऑक्सिडेंटमुळे विविध व्याधी आणि विषाणू संसर्गाशी लढण्यासाठी ताकद येते.
COMMENTS